railway 
महाराष्ट्र

उधना रेल्वे पॅसेंजरमध्ये दरवाज्यात बसण्याचा वाद; धावत्या रेल्वेतून फेकल्याने युवकाचा मृत्यू

उधना रेल्वे पॅसेंजरमध्ये दरवाज्यात बसण्याचा वाद; धावत्या रेल्वेतून फेकल्याने युवकाचा मृत्यू

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबारहुन उधनाकडे जाणाऱ्या पैसेंजर रेल्वेच्या प्रवासादरम्यान दरवाज्यात बसण्याच्या वादातून एका १७ वर्षीय युवकाला चिंचपाडा ते खातगाव दरम्यान असलेल्या पुलावरुन रेल्वे जात असताना रेल्वेतून कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (nandurbar-news-Udhana-railway-passenger-Youth-dies-after-being-thrown-from-running-train)

रेल्वेच्या (Railway) दरवाज्यात बसण्याच्या वादातून फरहाज कुरेशी हाजी मोबीन व संदीप गणेश वळवी यांच्यात हाणामारी झाली. या भांडणात फरहाज कुरेशी हाजी मोबीन (वय १७, रा. कुरेशी मोहल्ला, नंदुरबार) याला गाडीतून फेकले. गाडी पुलावरून जात असताना फेकल्‍याने पुलावरून ३० फुट खाली नदीत पडल्याने जागीच मृत्यू झाला आहे.

प्रवाशांनी पकडून दिले ताब्‍यात

प्रवाशांनी संदीप गणेश वळवी यास चिंचपाडा स्टेशन मास्तर कार्यालयात पकडुन ताब्यात दिले. सध्या तो विसरवाडी पोलिसांच्या ताब्यात आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस (Railway Police) व विसरवाडी पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून संशयित आरोपी संदीप गणेश वळवी याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेबाबत अधिक तपास विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : भिशीच्या पैशातून नागरिकांची आर्थिक लूट; वर्षभरापासून फरार पती- पत्नी ताब्यात

Cholesterol Symptoms : थोडं चालल्यानंतर लगेचच थकवा यतो? दुर्लक्ष करु नका, असू शकतं उच्च कोलेस्ट्रॉलचं लक्षण

Diwali Special MSRTC Bus : एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! दिवाळीसाठी अतिरिक्त ५५ गाड्यांचं नियोजन, जाणून घ्या कुठून कुठे धावणार बसेस

Kalyan : कल्याणमध्ये बसमध्ये चोरीचा थरार; दीड लाखांचा मोबाईल चोरीला गेल्याने प्रवाशांची झडती | VIDEO

Maharashtra Live News Update: कार्तिकीची विठ्ठल रूक्मिणी शासकीय महापूजा करण्याचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना

SCROLL FOR NEXT