Nandurbar Railway News Saam tv
महाराष्ट्र

सुरत– भुसावळ पॅसेंजरचा अपघात टळला; पॅसेंजर येत असताना रेल्वे फाटकमध्येच बंद पडला ट्रक

अनर्थ टळला..पॅसेंजर येत असताना रेल्वे फाटकमध्येच बंद पडला ट्रक

दिनू गावित

नंदुरबार : काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण तुम्ही आजवर अनेकदा ऐकली असेल. मात्र, बऱ्याचदा या म्हणीचा प्रत्यय देणाऱ्या अनेक घटना आपल्याला प्रत्यक्षात पाहायलाही मिळतात. अशीच एक घटना आज रात्री आठ वाजेच्या सुमारास (Navapur) नवापूर शहरालगत तीनटेंभा रेल्वे (Railway) गेटवर घडली. रेल्वेचे फाटक बंद करत असताना ट्रक रेल्वे रुळावरून मार्गस्थ होत होता. रेल्वे रुळावरील एक ट्रॅक क्रॉस केला. दुसऱ्या ट्रॅकवर ट्रक बंद पडला. त्याच ट्रॅकवरून रेल्वे पॅसेंजर (Surat) सुरतकडून भुसावळकडे मार्गस्थ होणार होती. (Nandurbar Railway News)

नवापूर शहरातून (Gujrat) गुजरात राज्यात जात असलेल्या ट्रकमध्ये काहीतरी बिघाड झाला. ट्रक रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वे गेटच्या मधोमध रुळावर आला आणि तिथेच बंद पडला. चालकाने ट्रक सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र ट्रक सुरू झाला नाही. एकीकडे रुळावर अडकलेली ट्रक तर दुसरीकडे रेल्वे पॅसेंजर गाडी येण्याची झालेली वेळ यामुळे चालक, नागरिक रेल्वे कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.

नागरीकांनी धक्‍का देवून हटविला ट्रक

सर्वांनी मिळून ट्रक रुळावरून हलवण्याचा प्रयत्न केला. पुढच्या बाजूला चढाव असल्याने ट्रक इंचभर देखील जागेवरून सरकत नव्हता. नवापूर शहरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी येऊन ट्रकच्या पुढच्या बाजूने धक्का मारून रुळावरून बाजूला केला. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटातच रेल्वे पॅसेंजर रुळावरून गेली. पाच मिनिटांचा ही विलंब झाला असता तर पॅसेंजर रेल्वेने ट्रकला धडक देऊन रेल्वेचा भीषण अपघात झाला असता. यात मोठी जीवित व वित्त हानी झाली असती. परंतु सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेने कुठलीही दुर्घटना झाली नाही. सदर घटनेची रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशीच म्हणण्याची वेळ आली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update: सरकारनं e-KYC करण्याचे का दिले निर्देश? बहिणींनो,छोट्याशा चुकीनं बँक खातं होईल रिकामं

loan waiver : मोठी बातमी! शेतकऱ्यांना थेट कर्जमाफी नाहीच, पण सरकार घेणार मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर

Jio Recharge Plan: जिओची नवी ऑफर! गेमिंग प्लॅनची सुरुवात फक्त ४८ रुपयांपासून; डेटा, कॉलिंग अन् दमदार ऑफर्स

Red Alert : पुढील ४८ तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे, तब्बल २२ जिल्ह्यांना रेड अलर्ट, शक्य असेल तर घरात राहा

SCROLL FOR NEXT