Nandurbar Traffic Police Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Traffic Police : वर्षभरात ५१ हजार वाहनधारकांवर कारवाई; नंदुरबार वाहतूक पोलिसांची कारवाई

Nandurbar News : वाहतूक नियमांचे पालन न करता बेशिस्तपणे गाडी चालविणे व रस्त्यांवर बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्यांवर नजर ठेवत शहरातील ५१ हजार वाहनधारकांवर कारवाई करण्यात आलेली आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदूरबार : अनधिकृतपणे वाहनांची पार्किंग तसेच शहरात बेशिस्तपणे वाहन चालवून नियमांचे उल्लंघन केले जाते. यामुळे बऱ्याचदा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असतो. अशा वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांची नजर असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अशाच प्रकारे नंदुरबार शहरात मागील वर्षभरात वाहतूक पोलिसांकडून ५१ हजार वाहनधारकांवर कारवाई करत त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. 

नंदुरबार शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक नियमांचे पालन न करता बेशिस्तपणे गाडी चालविणे व रस्त्यांवर बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्यांवर नजर ठेवत शहरातील ५१ हजार वाहनधारकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे वाहनधारकांना शिस्त लागणार आहे.

६२ लाखांची वसुली 

नंदुरबार वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने शहरात गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या कारवाईत ५१ हजार बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. तसेच त्यांना वाहतूक नियमांचे पालन न केल्याप्रकरणी दंड आकारण्यात आला असून या वाहनधारकांकडून ६२ लाखाची वसुली करण्यात आली आहे. 

कारवाई आणखी तीव्र होणार 

नंदुरबार वाहतूक पोलिसांकडून वर्षभर करण्यात आलेली कारवाई आणखीन तीव्र करण्यात येणार आहे. मार्च एंडिंग असल्याने या कालावधीत वाहतूक पोलिसांचे अधिक लक्ष असून विना लायसन्स, सिग्नल तोडणे, बेशिस्त वाहन पार्क, बेशिस्त गाडी चालविणे अशांवर लक्ष राहणार असून त्यांना दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

सप्तशृंगी गडावरून परतताना भीषण अपघात; दुचाकीला प्रवासी वाहनाची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT