Nandurbar Wedding Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar Wedding: लग्न वेळेवरच लावायचं, नवरदेव-नवरीला खांद्यावर घेऊन वऱ्हाडींचा नदीपात्रातून जीवघेणा प्रवास, नंदुरबारमधील धक्कादायक प्रकार

Priya More

सागर निकवाडे, नंदुरबार

लग्न म्हटलं की वरात आलीच. लग्नसोहळ्यामध्ये नवरा आणि नवरी यांची वरात काढली जाते. या वरातीमध्ये नवरा आणि नवरीकडील नातेवाईक सहभागी होतात आणि नाचतात. नवरा-नवरीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या वराती तुम्ही आतापर्यंत पाहितल्या असतील. पण नवरा-नवरीला खांद्यावर घेऊन नदीमधून त्यांची वरात निघाल्याचे तुम्ही कधी पाहिले नसेल. महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यात नवरा-नवरीची नदीतून वरात निघाली होती. वऱ्हाडींनी नवरा-नवरीला खांद्यावर घेऊन नदीतून वरात काढली होती. वऱ्हाडींवर असं करण्याची वेळ का आली? हे आपण पाहणार आहोत...

अक्कलकुवा तालुक्यात असणाऱ्या वेहगी गावाचा मुख्य रस्ता ते बारीपाड्याला जाणारा मार्ग नदी नाल्यातून जातो. पावसाळ्यात याठिकाणच्या देव नदीला पूर येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज पाण्यातून वाट काढत शाळेत जावे लागते. कोणतेही काम करण्यासाठी दुसऱ्या गावामध्ये जाण्यासाठी गावकऱ्यांना नदीतूनच प्रवास करावा लागतो. अशामध्ये गावामध्ये लग्न होते. सध्या या लग्नाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. यामागचे कारण म्हणजे नवरा आणि नवरीची वरात नदीमूधन निघाली होती. वऱ्हाडी मंडळींनी नवरा-नवरीला खांद्यावर घेऊन नदीपात्रातून ही वरात निघाली होती. गावाकडे जायला चांगला रस्ता नसल्याने नदीपात्रातूनच नवरा-नवरीची वरात घेऊन जावी लागली.

सातपुड्यातील दुर्गम भागात अनेक गावं आजही सोयी सुविधांपासून वंचित आहे. पावसाळ्यात तर रस्त्यांच्या अभावी नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी गावाच्या मुख्य रस्त्यापासून ते बारीपाडा, पाटीलपाडा येथे जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. पावसाळ्याच्या चार महिन्यांत तर या पाड्यांचा इतर भागांशी संपर्क तुटतो. परिणामी पाटीलपाड्याला जाण्या-येण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते.

नदी आणि नाल्यांमधून वाट काढत या गावकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. पाटीलपाडा येथील लोकसंख्या अंदाजे ६५० इतकी आहे. पावसाळ्यात रुग्णांना, गरोदर महिलांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना जिकिरीचा आणि त्रासदायक प्रवास करावा लागतो. त्यामुळे या पाडयांमध्ये जाण्यासाठी चांगल्या रस्त्याची आवश्यकता आहे. राज्यातील इतर भागांप्रमाणे आम्हाला जगण्यासाठी मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध नसाव्या का? असा संतप्त सवाल गावकरी विचारत आहेत. परंतु त्यांच्या या प्रश्नांकडे शासन, प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT