Shahada Vidhan sabha Saam tv
महाराष्ट्र

Shahada Vidhan sabha : काँग्रेसची डोकेदुखी वाढली! शहादा तळोदा मतदारसंघात बंडखोरीमुळं तिरंगी लढत

Nandurbar News : नंदुरबारच्या शहादा- तळोदा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये आलेल्या राजेंद्र कुमार गावीत यांना उमेदवारी देण्यात आली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा- तळोदा विधानसभा मतदारसंघात अर्ज छाननीनंतर तिरंगी लढत होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. प्रामुख्याने या मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीवर पदाधिकाऱ्यांची नाराजी असल्याने बंडखोरी करण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे. 

नंदुरबारच्या शहादा- तळोदा (shahada) विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये आलेल्या राजेंद्र कुमार गावीत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारीला काँग्रेसच्या (Congress) स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. कार्यकर्त्यांनी उमेदवार बदलून देण्याची मागणी केली होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी याकडे दुर्लक्ष केल्याने आज शहादा शहरात निष्ठावान पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पक्षाने उमेदवार बदलून न दिल्याने तीव्र आक्रोश करण्यात आला. 

दुसरीकडे काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या सात उमेदवारांपैकी एकाने अपक्ष निवडणूक लढावी; अशी मागणी करण्यात आली असून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी निवडणुकीच्या रिंगणातील आपली उमेदवारी कायम ठेवण्याचे एकमत झाले आहे. सुहास नाईक यांच्या उमेदवारीमुळे दुरंगी असलेली शहादा विधानसभा मतदारसंघातील लढत आता तिरंगी झाली असून कार्यकर्ते आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास यावेळेस सुहास नाईक त्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gauri Palve : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; डॉ गौरी पालवेची आत्महत्या की हत्या?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट?

Fact Check : आता पाईपलाईननं दारू मिळणार? सरकारकडे अर्ज केल्यानंतर कनेक्शन?

Smriti Mandhana: स्मृती मानधना-पलाशचं लग्न का पुढे ढकललं? कधी होणार लगीन? मुच्छलच्या बहिणीचा मोठा खुलासा

बिबट्या आला रे...! आधी गावात दहशत, आता पुणे शहरात एन्ट्री, VIDEO

SCROLL FOR NEXT