Navapur Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Navapur Vidhan Sabha : काँग्रेसचा गड असलेल्या नवापूर विधानसभेत तिरंगी लढत; अपक्ष उमेदवार शरद गावितांचे आव्हान

Nandurbar News : नवापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर विधानसभेत तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या उमेदवाराला भरत गावित यांच्यासह अपक्ष उमेदवार शरद गावित यांचे आव्हान आहे. यामुळे या विधानसभेत काँग्रेस आपला गड राखेल का? हे पाहणे महत्वाचे राहणार आहे. 

नवापूर (Navapur) विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे माजी केंद्रीय राज्य मंत्री राहिलेले माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित हे विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) रिंगणात असून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने उमेदवारी करत आहेत. तर आदिवासी विकास मंत्री असलेले डॉक्टर विजयकुमार गावित यांचे लहान बंधू माजी आमदार शरद गावित हे देखील अपक्ष उमेदवारी करत सर्वांचीच डोकेदुखी ठरत आहेत.

शरद गावित हे २००९ मध्ये नवापूरमधून आमदार झाले होते. तेव्हापासूनच शरद गावित या मतदारंसघात अपक्ष उमेदवारी करत आहे. भरत गावित आणि शरद गावित यांची उमेदवारी काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक यांची डोकेदुखी वाढली असून मतदार नेमका कोणाच्या बाजूने कौल देईल; हे पहा महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT