Nandurbar News
Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

हृदयद्रावक..नदी ओलांडताना तीन चिमुकल्यांचा बुडून मृत्यु

दिनू गावित

नंदुरबार : राहत असलेल्‍या ठिकाणावरून दुसऱ्या पाड्यावरील दुकानात सामान घेण्यासाठी जात असताना नदी ओलांडताना तीन चिमुकल्यांचा मृत्यु (Death) झाल्‍याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सदर घटना बुधवारी (१५ जून) दुपार घडली असून याबाबत रात्री उशिरा फिर्याद दाखल झाली आहे. (nandurbar news Three children drowned while crossing the river)

धडगाव (Dhadgaon) तालुक्यातील कुंडलचा मालपाडा येथे वास्‍तव्‍यास असलेले तीन चिमुकले आईने सांगितलेले सामान आणण्यासाठी (Nandurbar News) दुसऱ्या पाड्यावरील किराणा दुकानात जात होते. या दरम्‍यान देवानंद नदी ओलांडताना तीन चिमुकल्यांचा मृत्यु झाला. नदीतील पाण्यात खोल खड्यात बुडून तिघांचा मृत्यु झाला. निलेश दीलवर पाडवी (वय 4), मेहेर दिलवर पाडवी (वय 5) आणि पार्वती अशोक पाडवी (वय 5) अशी मयतांची नावे आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SCROLL FOR NEXT