Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar : विद्यार्थ्यांचा 'पायी पायी पाढे’ उपक्रम; जंगलातून चार किमीचा प्रवास करत प्राण्यांची भीती दूर करण्याचा प्रयत्न

Nandurbar News : 'पायी पायी पाढे' हा उपक्रम शिकण्याची प्रक्रिया आणि दैनंदिन जीवन यांना जोडणारा आदर्श नमुना आहे. हे साध्य करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक होत आहे. दुर्गम भागातील इतर शाळांसाठीही एक प्रेरणादायी उदाहरण ठरू शकतो.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: दुर्गम आदिवासी भागात शिक्षणाची गंगा पोहोचवणं हे आजही एक आव्हान आहे. पण या आव्हानांवर मात करण्यासाठी अनेक शिक्षक आपल्या कल्पकतेचा वापर करतात. असाच एक अभिनव उपक्रम नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात सुरू झाला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काल्लेखेतपाडा इथे सुरू असलेल्या ‘पायी पायी पाढे’ या उपक्रमाने सर्वांनाच थक्क केलं आहे.

नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. त्यातील धडगाव हा दुर्गम भागातील तालुका असून या तालुक्यातील उमराणी हे पाड्याच्या वस्तिचे गाव. सर्व पाडे एकमेकांपासून खुपच लांब. यातील एक पाडा काल्लेखेतपाडा येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. शाळेच्या पाच किलोमिटर परिघात वाहन जावू शकत नाही. फक्त पायवाट आहे. त्याही डोंगर, दरी, नदी, नाले, शेत, जंगलातून विद्यार्थ्यांना जावे लागते.  

२६२ विद्यार्थ्यांची दररोज पायपीट 

विद्यार्थ्यांना शाळेत जायचे असेल, तर सुमारे चार- पाच किलोमिटर बिकट पायवाटेतून पायपिट करण्याशिवाय पर्याय नाही. त्यातही जंगली स्वापदांची भिती असते. तरिही या शाळेत परिसरातील चार- पाच गावे आणि सुमारे १२ पाड्यांमधील २६२ विद्यार्थी दररोज ३ ते ४ किलोमीटरची पायपिट करुन नियमितपणे शाळेत येतात. कारण येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या याच प्रवासाला मनोरंजक करुन शिक्षणाचं माध्यम बनवलं आहे. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर केला आहे. त्यांना पाढे पाठ करायची सवय लावली आहे.

असा आहे उपक्रम 
शिक्षकांनी मुलांचे छोटे गट तयार केले आणि प्रत्येक गटात एक ‘पाढा नेता’ नेमला. प्रत्येक विद्यार्थी आपल्या घरातून निघुन चालत येणाऱ्या नेहमीच्या गटात सहभागी होतो. शाळेत जाताना ही मुलं फक्त चालत नाहीत, तर निसर्गाचा आनंद घेत, हसत खेळत तालासुरात पाढे म्हणत चालतात. कधी गाणी, कधी प्रश्नोत्तरे, तर विविध घोषणा देत चालत जातात. यातूनच त्यांचा मार्ग तर सुकर होतो; तसेच सहज बिकट वाटा, नदी, नाले चालुन जातात, टेकड्या चढून जातात. त्यांचा गणित विषयाचा अभ्यास सतत सुरू असतो.

उपक्रमाचा मुलांना फायदा 

हा उपक्रम सुरू करण्यामागे काही महत्त्वाची उद्दिष्ट्ये होती. एक म्हणजे मुला- मुलींचा प्रवास तर सुकर झालाच. तसेच वेळेचा सदुपयोगही झाला. या प्रवासादरम्यान जंगली प्राणी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांपासूनही मुलांची सुरक्षा झाली. कारण सातत्याने आवाज होत असल्याने स्वापदं जवळ येत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे १ ते ३० पर्यंतचे पाढे सहज पाठ करून घेतले जात आहेत. मोठ्या मुलांकडून लहान मुलांना शिकण्याची संधी देणं, ज्यामुळे सहशिक्षणाची आणि सर्जनशील शिकवण्याची एक उत्तम संस्कृती तयार झाली आहे.

उपक्रमामुळे गणिताची भीती दूर 
उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या पाढे पाठ करण्याच्या गतीमध्ये आणि अचूकतेमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. लहान मुलांनी मोठ्या मुलांकडून उच्चार आणि लय सहजपणे शिकून घेतली. गणिताची भीती जाऊन त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे. शाळा सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या अभ्यासाची सुरुवात होते. पाढे मनोरंजक व्हावे; यासाठी उलटे व आडवे पाढेही पाठ करायला लावली जातात. पाढे म्हणत प्रवास होत असल्याने त्यांना थकवाही जाणवत नाही. उर्जा टिकून राहिल्याने अभ्यासा सोबत खेळातही त्यांचे मन रमते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - १४ नोव्हेंबरला बिहारला मिळणार नवा मुख्यमंत्री, वाचा निवडणूकीचं संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Costal Road : वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दणका बसणार; मुंबईतील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मोठा निर्णय

गौतमी पाटील कारवाईच्या कचाट्यातून 'निसटली'! १०० पेक्षा जास्त CCTV चेक केले, शेवटी पोलिसांना नेमका क्लू मिळाला

Metro 3 बाबत महत्त्वाची अपडेट! वरळी ते कफ परेडदरम्यान मेट्रो धावणार, मुंबईकरांचा वेळ वाचणार

Fast Charging Risks: फास्ट चार्जिंग वापरताय? स्मार्टफोनवर होऊ शकतात वाईट परिणाम, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT