Nandurbar news Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यातील आठ कमकुवत पुलांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट; गुजरातच्या पूल दुर्घटनेनंतर प्रशासनाचा निर्णय

Nandurbar news : कमकुवत झालेले हे पूल धोकेदायक ठरत असतात. पावसाळ्याच्या दिवसात नदीला मोठा पूल आल्यास किंवा अतिमुसळधार पावसात पूल कोसळण्याची अधिक शक्यता निर्माण होत असते

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: कमकुवत झालेल्या पूल पावसाळ्यात कोसळण्याची शक्यता असते. यामुळे मोठी दुर्घटना नाकारता येत नाही. यातच गुजरातमध्ये पूल कोसळण्याची घटना घडली आहे. यानंतर प्रशासन अलर्ट झाले असून नंदुरबार जिल्ह्यातील पुलांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. यातील कमकुवत असलेल्या ८ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार केले जाणार आहे. अर्थात पुढील होणारी दुर्घटना टाळता येणार आहे. 

नद्यांवर पुलाची उभारणी करण्यात आलेली आहे. काही पूल हे ब्रिटिश काळापासूनचे आहेत. तर काही पुलांची उभारणी करण्यास अनेक वर्षांचा कालावधी झाल्याने त्यांची मुदत संपल्याने त्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असते. कमकुवत झालेले हे पूल धोकेदायक ठरत असतात. पावसाळ्याच्या दिवसात नदीला मोठा पूल आल्यास किंवा अतिमुसळधार पाऊस झाल्यास पूल कोसळण्याची अधिक शक्यता निर्माण होत असते. 

आठ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट 
गुजरात मधील पूल कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर आता नंदुरबार जिल्हा प्रशासन देखील अलर्ट झाले असून जिल्ह्यातील कमकुवत पूलांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील 35 फुलांचे पावसाळ्यापूर्वीच सर्वेक्षण करण्यात आले आहे. मात्र आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पुलांचा आढावा घेतल्यानंतर आठ कमकुवत पुलाचा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

तर नंदुरबार जिल्ह्यात होऊ शकते मोठी दुर्घटना 

पावसाळा सुरू झाला असला तरी अद्यापही ऑडिट कारणात आलेले नाही. मुळात जिल्ह्यातील आठ पूल जीर्ण झाले असून ते वाहतुकीसाठी धोकादायक झालेले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असून अशात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर पावसाळा सुरू झाला असला तरी अद्यापही ऑडिट झाला नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाचा कार्यप्रणालीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Rules: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! ऑनलाइन पेमेंटच्या नियमात केले बदल; तुमच्यावर काय होणार परिणाम? वाचा

Maharashtra Live News Update : साताऱ्यात जे घडलं ती गुंडगिरी, झुंडगिरी - संजय राऊत

Ginger- Jaggery Tea Recipe: आलं टाकून गुळाचा स्पेशल चहा कसा बनवायचा?

Shocking : भाजप नेत्याच्या मुलाचे सेक्स स्कँडल उघड; २५ हून अधिक मुलींचे शोषण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

WhatsApp Update: खुशखबर! WhatsApp चॅटींगसाठी फोन नंबरची गरज नाही? वाचा नव्या फीचरची संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT