Nandurbar News
Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस; नंदुरबार जिल्‍ह्यात सलग दुसऱ्या दिवशी हजेरी

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी देखील अवकाळी पावसाची हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या (Farmer) हातात तोंडाशी आलेला घास पूर्णपणे वाया जाण्याची (Nandurbar News) भीती व्यक्त केली जात आहे. (Tajya Batmya)

वादळी वाऱ्या आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, तळोदा, धडगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेले मका, गहू, हरभरा, ज्वारी पिकांचे नुकसान होणार आहे. तर फळबागातील पपई आणि केळीच्या देखील मोठ्या नुकसान होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र राज्यातील कर्मचारी जुनी पेन्शन मिळवण्यासाठी संपावर गेले असल्याने याच्या फटका अवकाळी पावसात फटका बसलेल्या शेतकऱ्यांवर होणार आहे.

अवकाळी पाऊस एका आठवड्यात आज तिसऱ्यांदा पाऊस झाला आहे. त्यामुळे संपावर गेले असलेल्या कर्मचाऱ्यांकडून पंचनामे होणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई कशी होणार? असाच काहीसा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत आहे. तर दुसरीकडे आसमानी संकटापासून शेतकरी सामोरे जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यासमोरील आव्हान दिवसात दिवस वाढत आहे. त्यात शेतकऱ्याने मदत केली तर काहीसा दिलासा मिळेल अशीच अपेक्षा आता शेतकरी करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI Vs LSG : मुंबईचा प्लेऑफचा पत्ता जवळपास कट; लखनौचा मुंबईवर ४ गडी राखून विजय

Maharashtra Tourism: सूर्य आग ओकतोय! उष्णतेच्या झळा थंड हवेच्या ठिकाणांनाही, पर्यटकांनी फिरवली पाठ

Narendra Modi Exclusive : अभिजित पवार यांनी PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; देशभरासह महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर झाली चर्चा

India T20 World Cup Squad : किंग कोहलीवर विश्वास कायम, पंत आणि चहलचंही कमबॅक; टी-20 वर्ल्डकप टीमबाबत ५ महत्वाचे मुद्दे

PM Narendra Modi आणि एपी ग्लोबालेचे संस्थापक अभिजीत पवार यांची नवी दिल्लीत भेट

SCROLL FOR NEXT