Navapur Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Navapur Bus Accident : बंद बस अचानक सुरु होऊन दुकानात शिरली; नवापूर बसस्थानकातील थरार, दोन विद्यार्थिनींसह चारजण जखमी

navapur News : नवापूर बसस्थानकात चालकाने उभी केली होती. या बसमध्ये विद्यार्थी बसले होते. यावेळी बसमध्ये चालक किंवा वाहक कोणीही नव्हते. मात्र उभी बस अचानक सुरू होऊन ती पुढे धकू लागली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : बसस्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी बस उभी करून चालक उतरला. मात्र काही वेळाने बस अचानक सुरु झाली आणि धावू लागली. यामुळे सदरची बस हि स्थानकातील दुकानामध्ये शिरली. यामुले झालेल्या अपघातात चारजण जखमी झाले आहेत. यात दोन लहान विद्यार्थिनीचा समावेश आहे. हि थरारक घटना नंदुरबारच्या नवापूर बसस्थानकात घडली आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर बसस्थानक २ एप्रिलला दुपारच्या सुमारास सदरची घटना घडली आहे. नवापूर- भोमदीपाडा हि बस नवापूर बसस्थानकात चालकाने उभी केली होती. या बसमध्ये विद्यार्थी बसले होते. यावेळी बसमध्ये चालक किंवा वाहक कोणीही नव्हते. मात्र उभी बस अचानक सुरू होऊन ती पुढे धकू लागली. यानंतर थेट बसस्थानकासमोर असलेल्या ए वन पान दुकान व पाणी बॉटल विक्रीच्या दुकानात शिरली. 

चारजण जखमी 

बस दुकानामध्ये शिरल्याने दोन्ही दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुकानमालक एकनाथ मोरे व माज अजिम पठाण यांच्यासह बसमध्ये बसलेल्या दोन शाळकरी विद्यार्थिनी जखमी झाले आहेत. या चौघांना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, आगारप्रमुख विजय पाटील यांनी बसस्थानकावर जाऊन पाहणी केली. बसमध्ये बसलेले विद्यार्थी भयभीत झाले होते. 

मोठा अनर्थ टळला 

बस नवापूर येथून करंजी- भोमदीपाडा येथे दुपारी साडेबाराला मार्गस्थ होणार होतु. मात्र, त्यापूर्वीच बस सुरू होऊन दुकानात शिरली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे प्रवाशी घाबरले होते. मात्र बसस्थानक आवारात असलेल्या एकाने जीवाची पर्वा न करता बसमध्ये चढून ब्रेक लावत बस थांबविली. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान विद्यार्थ्यांकडून खोडसाळपणा झाल्याची शक्यता असून नवापूर बस स्थानकात हा अपघात कसा घडला? या संदर्भात डेपो मॅनेजर व कंट्रोल मधील कर्मचारी बोलायला तयार नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT