एसटी  
महाराष्ट्र

एसटी कर्मचारी रात्री मुंबईच्या दिशेने; पोलिसांनी बस अडवून केली जप्त

दिनू गावित

नंदुरबार : रात्री उशिरा नंदुरबार जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईच्या दिशेने आगेकूच केली होती. परंतु, या कर्मचाऱ्यांना मुंबईला पोहचण्यापुर्वी पोलिसांनी अडविले. कर्मचारींना मुंबईला जाण्यापासून रोखत बस जप्‍त केली आहे. (nandurbar-news-ST-staff-towards-Mumbai-at-night-Police-intercepted-the-bus-and-seized)

जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील अशी प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे. एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे सलग तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यात एसटी प्रवासी वाहतूक सेवा बंद राहण्याची शक्यता आहे. यात नंदुरबार आगारातून उशिरा रात्री मुंबई येथे मोर्चासाठी निघालेल्या एसटी कर्मचाऱ्यांची बस पोलिसांनी अडवून शहर पोलिस ठाण्यात जप्त केली आहे. पोलिसांच्या दबावतंत्रामुळे मंत्रालयावर धडक मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांची गळचेपी झाली आहे.

बसचे कागदपत्र नसल्‍याचे कारण

जिल्ह्यातील इतर आगारातील एसटी कर्मचारी सोयीनुसार आपापल्या पद्धतीने मोर्चात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. परंतु रस्त्यात पोलिस प्रशासनाच्यावतीने अडवणूक केली जात आहे. नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात एसटी कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या बसच्या कारवाईबद्दल पोलीस प्रशासनाला विचारले असता सदर बसचे कागदपत्र नसल्यामुळे कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : किरकोळ वाद टोकाला गेला; दोन कुटुंबात लोखंडी रॉड आणि बांबूने तुफान हाणामारी, VIDEO

Fact Check: 99 रुपयांत मिळणार दारू? सरकारने आणलं नवं मद्य धोरण? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? वाचा...

Tirupati laddu news : तिरूपतीच्या लाडूंमध्ये चरबी, माशांचं तेल; आरोप-प्रत्यारोपांचा तडका, राजकीय फोडणी

Maharashtra Politics: मविआत मोठा भाऊ कोण? जागांवर अडले, भाऊ-भाऊ भिडले; मविआत जागावाटपावरून खडाजंगी

Budgam Bus Accident Video: काश्मीरमध्ये पुन्हा भीषण दुर्घटना; BSF जवानांनी खचाखच भरलेली बस खोल दरीत कोसळली, ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT