Dhadgaon nagar panchayat election saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा भगवा; आदिवासी विकास मंत्री पाडवींना धक्का

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा भगवा; आदिवासी विकास मंत्री पाडवींना धक्का

दिनू गावित

नंदुरबार : धडगाव- वडफळ्या- रोषमाळ बु. नगरपंचायतीच्या एकूण १७ जागांचे निकाल जाहीर झाले असून शिवसेनेने १७ पैकी १३ जागांवर विजय मिळवून नगरपंचायतवर भगवा फडकवला आहे. तर राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांचा मतदारसंघ असलेल्या धडगाव नगरपंचायतमध्ये (Dhadgaon Nagar Panchayat Election) काँग्रेसला फक्त ३ जागांवर विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे भाजपाने आमदार डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच धडगाव नगरपंचायतमध्ये उमेदवार रिंगणात उभे केले होते भाजपला (BJP) १ जागेवर विजय मिळाला आहे. (nandurbar news Shiv Sena threw saffron in Dhadgaon Nagar Panchayat election)

धडगाव नगरपंचायतमधील निकालाचे चित्र पाहता काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला असलेल्या धडगाव नगरपंचायतमध्ये मंत्री के. सी. पाडवी (K C Padavi) यांना मोठा झटका बसला आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांचा हा मतदारसंघ असून त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने १७ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी फक्त ३ जागांवर विजय मिळवता आला आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सभापती गणेश पराडके व जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके यांनी शिवसेनेसाठी (Shiv Sena) कंबर कसली होती. अखेर शिवसेनेने विजयश्री खेचून आत धडगाव नगरपंचायतीवर भगवा फडकवला आहे.

युती नसल्‍याचा कॉंग्रेसला फटका

महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना युती न केल्यामुळे काँग्रेसला जबरजस्त फटका बसला. धडगाव नगरपंचायतीमध्ये काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी पक्ष निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिला होता. परंतु त्यांनी मान्य न केल्यामुळे आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवली आणि महाराष्ट्रातील सर्वात अतिदुर्गम भागा असलेल्या धडगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांनी शिवसेनेला १७ पैकी १३ जागांवर विजय मिळवून दिला आहे. हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे.

शिवसेना - 13 जागांवर विजयी

काँग्रेस - 03 जागांवर विजयी

भाजप - 01 जागांवर विजयी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : आष्टीत पोस्टल मतदानात दबावतंत्र; राम खाडे यांचा आरोप, निवडणूक विभागाकडे तक्रार

Disha Patani Fees: 'कंगुवा' चित्रपटासाठी दिशा पटानीने घेतले तब्बल इतके कोटी, आकडा थक्क करणारा

Karisma Kapoor: काळ्या सिक्विन साडीत करिश्मा कपूरच्या मनमोहक अदा, सौंदर्याने छेडल्या नजरा

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT