Nitin Bangude Patil Saam tv
महाराष्ट्र

Nitin Bangude Patil Statement : म्हणूनच राज्यकर्ते निवडणूक घ्यायला घाबरताय; शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा सरकारवर निशाणा

Nandurbar News : म्हणूनच राज्यकर्ते निवडणूक घ्यायला घाबरताय; शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा सरकारवर निशाणा

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदूरबार : राज्यातील जनता राजकीय परिस्थितीला कंटाळली असून या परिस्थितीवर जनता निवडणुकीच्या माध्यमातून योग्य उत्तर देईल. त्यामुळे (Nandurbar) राज्यकर्ते निवडणुका घ्यायला घाबरत आहेत. मात्र ज्यावेळेस निवडणुका येतील त्यावेळेस जनता राज्यकर्त्यांची जागा त्यांना दाखवून देणार असे वक्तव्य (Shiv Sena) शिवसेनेचे उपनेते आणि वक्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले आहे. (Live Marathi News)

नंदुरबार शहरात गुणगौरव सोहळ्यासाठी शिवसेनेचे उपनेते आणि वक्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील नंदुरबार शहरात आले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना सरकारवर निशाणा साधला आहे. विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायावर आवाज उठवला असून सरकार फक्त घोषणा करत असल्याचे म्हटले आहे.  

भिडे गुरुजींचे वक्तव्य निंदनीय 
संभाजी भिडे यांच्याकडून वारंवार महापुरुषांच्या अपमान केला जात असून, महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये महात्मा गांधी यांचे मोथे योगदान आहे. त्यामुळे गांधीजींना जगभरातच मानलं जात आहे. यांच्यावर बोलणं निंदनीय आणि निषेधार्थ आहे.

राज्य शासन फक्त घोषणा करतेय 

विद्यार्थ्यांसाठी कुठलीही भरती प्रक्रिया राबवत नाही आहे. तर ज्या भरती प्रक्रिया राबवली जात आहेत. त्यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल केले जात आहेत. विद्यार्थ्यांनी अनेक परीक्षा दिल्या आहेत. मात्र या विद्यार्थ्यांना न्याय देण्याच्या काम सरकारकडून होताना दिसून येत नाही. विद्यार्थी, शेतकरी, कामगार कष्टकरी यांच्या संदर्भात राज्य शासनाच्या फक्त घोषणा करत असून कृती मात्र शून्य आहे. त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांच्या अंत बघण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा सरकारला दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

SCROLL FOR NEXT