Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: शहादा- दोंडाईचा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रस्ता रोको; प्रशासनाचा लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
: शहादा- दोंडाईचा शहराला जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी (Nandurbar) नागरिकांनी प्रशासनाला वारंवार तक्रारी केल्या आहेत. तरी देखील दुरुस्ती होत नसल्याने संतप्त नागरिकांनी आज रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे (Shahada) वाहतूक खोळंबली होती. (Latest Marathi News)

शहादा तालुक्यातील रस्त्यांचे दुरावस्था झाली असून प्रशासनाला वारंवार तक्रारी करूनही रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने आज शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पाठिंब्यावर रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारोच्या संख्येने  नागरिक (Rasta roko) सहभागी झाले होते. रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  

लेखी आश्वासन 

आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनात शहादा तालुक्यातील सर्वच पक्षीय नेते आजी माजी आमदार जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह सर्वच राजकीय कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला स्वत:च्या रक्षणासाठी 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

SCROLL FOR NEXT