Nandurbar Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Bribe Trap: सार्वजनिक गुजराती हायस्कूलमधील वरिष्ठ लिपिक एसीबीच्‍या जाळ्यात; ४५ हजाराची मागितली लाच

सार्वजनिक गुजराती हायस्कूलमधील वरिष्ठ लिपिक एसीबीच्‍या जाळ्यात; ४५ हजाराची मागितली लाच

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : रजा रोखीकरणाचे बिल काढण्यासाठी लाच मागितल्‍याचा प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर (Navapur) शहरातील सार्वजनिक गुजराती हायस्कूलमध्‍ये समोर आला. या प्रकरणात वरिष्ठ लिपिक विनोद साकरलाल पंचोली (वय ५०) लाचलुचपत विभागाच्‍या (ACB) जाळ्यात अडकला. (Maharashtra News)

नवापूरमधील सार्वजनिक गुजराती हायस्‍कूलमधील वरिष्‍ठ लिपिक पंचोली याने तक्रारदार यांच्याकडून रजा रोखीकरणाचे बिल काढून देण्याचा मोबदल्यात ४५ हजारांची लाच घेताना नंदुरबार लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले. यासंदर्भात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या रजा रोखिकरणाची रक्कम लाचखोर विनोद पंचोली याने दिलेल्या धनादेशाद्वारे तक्रारदार यांच्या बँक खात्यात जमा झाली होती.

तक्रारदार यांची रजा रोखीकरणाची रक्कम काढून दिल्याबद्दलच्या मोबदल्यात लाचखोर विनोद पंचोली याने तक्रारदार यांच्याकडून ४५ हजार रुपये लाचेची (Bribe) मागणी करून २१ जूनला नवापुर शहरातील रहात्या घरी गुजर गल्लीत लाचेची रक्कम स्वीकारली आहे. त्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून नवापुर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचखोर वरिष्ठ लिपिक विनोदी पंचोली याने लाच घेतल्याप्रकरणी शैक्षणिक क्षेत्रात मोठी खडबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup 2026: सेमीफायनलची दारं उघडी ठेवण्यासाठी भारतासमोर NRRचं गणित, झिम्बाब्वेविरुद्ध विजयाचं स्पष्ट समीकरण पाहा

Chandrapur Crime : चंद्रपूरमध्ये हत्येचा थरार! भावाने सख्ख्या बहिणीला संपवलं, हल्ल्यात आईसुद्धा गंभीर जखमी

Kidney Failure Symptoms: किडनी निकामी होण्याआधी हे ३ गंभीर आजार देतात अलर्ट; तज्ज्ञांनी सांगितली नेमकी कारणं, वेळीच व्हा सावध

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर शहरावर पाणी संकट

Bank Account: जुनं बँक अकाउंट वापरत नाही? आजच करा हे काम अन्यथा खिशाला बसेल फटका

SCROLL FOR NEXT