बस  
महाराष्ट्र

नंदुरबार : दुसरा दिवसही संपाचा; बस आगारात बंद

नंदुरबार : दुसरा दिवसही संपाचा; बस आगारात बंद

दिनू गावित

नंदुरबार : राज्‍य परिवहन महामंडळाचे कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. या संपाचा दुसरा दिवस असून सलग दुसऱ्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. यामुळे जिल्ह्यातील चारही आगारातील एसटी प्रवासी वाहतूक सेवा बंद आहे. (Nandurbar-news-Second-day-of-strike-The-bus-stops-at-the-depot)

राज्यभर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संप नंदुरबार जिल्ह्यातही सलग दुसऱ्या दिवशी सुरू आहे. अक्कलकुवा, नवापूर, शहादा, नंदुरबार चारही आगारातील एसटी प्रवासी वाहतूक सेवा बंद आहे. एसटी कर्मचाऱ्यांना आत्मसन्मानाने राज्यशासन कर्मचाऱ्यांमध्ये विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद करून लढा सुरू ठेवलेला आहे.

माफी व सहकार्यची मागणी

एसटी कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनामुळे प्रवाशांच्या गैरसोयीबाबत माफी मागत सहकार्य करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसेच परिवहन विभागाने खाजगी वाहतुकीला दिलेल्या परवानगीचा एसटी कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. यापुढेही लालपरीची दर्जेदार सेवेसाठी प्रवाश्यांनी आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आताची सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठी संधी; भाजपच्या 'या' सर्वात ताकदवर समितीत होणार एन्ट्री?

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

FD Break Rules: FD तोडण्याचा विचार करताय? आधी जाणून घ्या बँक किती पेनल्टी कापते आणि नुकसान कसे टाळाल

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

SCROLL FOR NEXT