Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

शाळा सुरू होण्याच्या दोन दिवस आधीच शाळेचे पत्रे उडाले

शाळा सुरू होण्याच्या दोन दिवस आधीच शाळेचे पत्रे उडाले

दिनू गावित

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन येथे वादळी वारा पावसाने अनुदानित आश्रम शाळेच्या इमारतीचे पत्रे उडून लाखोंचे नुकसान झाले आहे. शाळा सुरू व्‍हायला दोन दिवस बाकी राहिले असताना पत्रे उडाल्‍याने आता शाळा (School) कशी भरणार याकडे लक्ष आहे. (nandurbar news school's were blown up two days before school started)

अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी शनिवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार वाऱ्यामुळे (Nandurbar News) आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ धडगाव संचलित देवमोगरा पुनर्वसन (मांडवा) अनुदानित आश्रम शाळेच्या इमारतीचे पत्रे उडून लाखोंचे नुकसान झाले.

सहाशे विद्यार्थी घेतात शिक्षण

देवमोगरा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित आश्रम शाळा असून सुमारे सहाशे विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु काल आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अधिक्षक गृह, कोठी गृह व प्राथमिक व माध्यमिक वर्ग भरत असलेल्या इमारतीचे पत्रे उडाली. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. शासन व प्रशासनाने त्वरीत लक्ष्य देऊन इमारत दुरुस्ती करावी जेणेकरून चालू शैक्षणिक हंगामात वर्ग भरण्यास सोयीस्कर होईल अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate : १० तोळं सोन्याचे दर ५००० रूपयांनी वाढले, आजचे भाव काय? जाणून घ्या सविस्तर

Bhandara : भंडाऱ्यात मुसळधार पाऊस, गावांचा संपर्क तुटला | VIDEO

Maharashtra Live News Update : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनकडून मुक्ताईला साडी चोळीचा आहेर भेट

Saam Impact : दोन पुलांच्या उभारणीसह ६ किमीचा रस्ता; साम टीव्हीच्या बातमीनंतर बांधकाम विभागाकडून मोजणी

IAS अधिकाऱ्यांचे काम काय असते?

SCROLL FOR NEXT