Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: सातपुड्याच्या जंगलातुन निघातोय आगीचे धूर; तिनसमाळच्या डोंगराला पुन्हा आग

सातपुड्याच्या जंगलातुन निघातोय आगीचे धूर; तिनसमाळच्या डोंगराला पुन्हा आग

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : शासन व केंद्र शासन वृक्ष लागवडीवर कोटी रुपये खर्च करून झाडे लावा, झाडे जगवा या वृक्ष संवर्धनाच्या योजना राबवत आहे. परंतु, ओसाड पडलेले डोंगर यामध्ये अशा रात्रीच्या वेळी कुणीतरी (Nandurbar News) अज्ञात व्यक्तीने येऊन आग लावत असेल तर याला आळा घालणे गरजेचे आहे. नाहीतर काही दिवसांनी संपूर्ण जंगल हे जळून खाक होणार आहे. (Letest Marathi News)

नंदूरबार जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणार सातपुड्याच्या पर्वत रांगा असून त्यातच धडगाव तालुक्यातील तिनसमाळ हद्दीत असलेल्या सातपुडा डोंगर रांगेत लिमगव्हाण परिसरात डोंगराला सकाळी भीषण आग लागल्याच दिसून आले. या डोंगरांना नेहमी आग कोण लावत आणि मागचा उद्देश काय? आज सकाळी डोंगराचा उंच भगत धुराचे लोट निघत असताना गावकरी घटनास्थळी धाव घेतली. तेथे जाउन पाहिले असता शेकडो हेक्टर क्षेत्राचा डोंगर जाळून खाक झाल्याचे चित्र दिसले. त्यात लहान- मोठ्या झाड जळून नष्ट झाल्याचे दिसून आल्याची गावकऱ्यांनी माहिती दिली. यासोबतच गुरांसाठी वापरला जाणारा चारा संपूर्णपणे जळालेल्या गुरांना आता चारा द्यायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे

दरवर्षी अशाच पध्दतीने डोंगराला आग लावून जंगल संपवण्याचा प्रयत्‍न केला जातो. यावर्षी याच ठिकाणी लाखो रुपये खर्च करून सीसीटीची कामे करण्यात आली होती. लवकरच या गोष्टींना आडा घातला नाही; तर संपूर्ण जंगल हे नामशेष होईल. यासाठी सर्वस्वी जबाबदारी ही वन विभागाची असून वन विभाग नेहमक काय पाऊल उचलते यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: 18 नोव्हेंबरनंतर लाडकी बहीण योजना बंद? खर्च सरकारला परवडेना? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Bihar Election Result Live Updates: एनडीएने बहुमताचा आकडा ओलांडला, कोण किती जागांवर आघाडीवर?

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज अपघात प्रकरणी गुन्हा दाखल, तिघांवर गुन्हा दाखल

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेला फिरकीच्या जाळ्यात गुंडाळणार; टीम इंडिया मैदानावर उतरवणार ४ हुकुमी एक्के

शिवसेना ठाकरे गटाच्या खासदाराच्या घरातच फूट; काकांनी सोडली साथ, नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढली

SCROLL FOR NEXT