Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: कुपोषण, बालमृत्यू संपविण्यासाठी सरपंच रणांगणात; प्रशासनाने टाकली सरपंचाच्या खांद्यावर जबाबदारी

कुपोषण, बालमृत्यू संपविण्यासाठी सरपंच रणांगणात; प्रशासनाने टाकली सरपंचाच्या खांद्यावर जबाबदारी

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : कुपोषण आणि बालमृत्यूच्या संदर्भात नंदुरबार जिल्ह्याचा महाराष्ट्रात पहिला क्रमांक लागतो. प्रशासकीय स्तरावरून अनेक शासकीय योजना राबविली जात असतात. तसेच तालुकास्तरावर देखील अनेक संस्था काम करत असुन देखील कुपोषणाचे (Malnutrition) प्रमाण कमी होत नसल्याचे चित्र आहॆ. कुपोषणाला नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातुन हद्दपार करण्यासाठी आता शासनाने सरपंचांना सोबत घेतले आहे. (Tajya Batmya)

राज्यातील सर्वाधिक कुपोषित बालक आणि बालमृत्यू असलेला जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख आहे. नंदुरबारच्या कपाळावर असलेल्या कुपोषणाचा कलंक मिटविण्यासाठी राज्याने केंद्र शासनाने अनेक योजना आणल्या त्या राबविण्यात आल्या. मात्र कुपोषण कमी होत नव्हते. योग्य माहिती हाती मिळावी आणि कारभार हाकणाऱ्या सरपंचांच्या मदतीने योजना थेट कुपोषित बालकांच्या घरापर्यंत पोहोचवाव्यात यासाठी सरपंचाची मदत घेतली जाते आहे. सरपंच गावातील सर्वच माहिती जिल्हा प्रशासनाला देणार आहे.

नंदुरबार पॅटर्न ठरणार

सरपंचासोबत येऊन कामकाज करणार असल्याने अंगणवाडी सेविकांचे कामही सोपे झाले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने सरपंचांना कुपोषण मोहिमेत उतरवण्याचा निर्णय खूप योग्य असल्याचं अंगणवाडी सेविका सांगतात. गाव कारभाऱ्यांच्या मदतीने कुपोषणाला जिल्ह्यातून कायमचे हद्दपार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने घेण्यात आलेला हा निर्णय नंदुरबार पॅटर्न म्हणून संपूर्ण देशात ओळखला जाईल हे मात्र निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंतप्रधान मोदींच्या फोटोवर जादूटोणा? मोदींच्या फोटोजवळ हळद-कुंकू, लिंबू आणि नारळ; घटनेने खळबळ

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग

जळगावात शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह, अस्मानी संकटातही बळजबरी वसुली?

SCROLL FOR NEXT