नंदुरबार : महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड व्हावी; म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आनंदाचा शिधा नावाचे किट वाटप करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा शिधा दिवाळीनंतरच (Diwali) लाभाथ्र्यांना पोहचणार असल्याची स्थीती नंदुरबार (Nandurbar) आदिवासी पाडे, वस्तींवर आहे. अर्थात तोपर्यंत सर्वसामान्यांची दिवाळी संपलेली असेल. (Tajya Batmya)
आनंदाचा शिधा यात एक किलो साखर एक किलो रवा एक किलो चणाडाळ तर एक किलो पामतेल याचा समावेश आहे. नंदुरबार (Nandurbar News) जिल्ह्यातील शासकीय गोडाऊनमध्ये सहा हजार किट साखर, तर आठ हजार किट चना दाल पोहचले आहे. तर पामतेल आणि रवा एक लाख किटपर्यंत पोहोचले आहेत. उर्वरित साहित्य येण्यासाठी आणि त्याच्या पॅकिंगसाठी कमीत कमी आठवडाभराचा कालावधी लागेल. तसेच जिल्ह्याचा विचार करता, सातपुड्याचा दुर्गम भागात हे कीट पोचवण्यासाठी अजून आठवडाभराचा कालावधी लागेल. म्हणजे दहा ते बारा दिवस जिल्ह्यातील रेशन दुकानांवर या किटचा प्रवास चालेल.
महिलांच्या दुकानांना भेटी
मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या प्रमाणे दिवाळीत मिळणाऱ्या किटसाठी अनेक आदिवासी पाडांवरील महिला आपल्या गावातील दुकानांना भेटी देत आहेत. मात्र अजूनही प्रशासनाच्या वतीने किटचा पुरवठा न झाल्याने त्याचे वाटप सुरू न झाल्याची माहिती रेशन दुकानदार देतात. जिल्ह्यासाठी लागणारे एकूण 2 लाख 63 हजार 821 किट आवश्यक आहे. यापैकी आतापर्यंत रवा ९०४९० किट (४५ टक्के), साखर ६६९० किट (२ टक्के), चणाडाळ ८०१० किट (२ टक्के), पामतेल ११६६४० किट (५० टक्के) पोहचले आहेत.
दिवाळी गोड कशी?
सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी शासनाने घेतलेला हा निर्णय असला तरी अजूनही हे साहित्य पोहोचले नसल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड कशी होणार? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.