Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: सरपनी नदीला पुर; पुलावरील वाहतूक पाचव्यांदा बंद

सरपनी नदीला पुर; पुलावरील वाहतूक पाचव्यांदा बंद

दिनू गावित

नंदुरबार : नागपूर- धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावाजवळील सरपनी नदीचा पूल पुन्हा पुराच्या पाण्याखाली गेला आहे. यामुळे पाचव्यांदा या पावसाळ्यात अवजड वाहतूक बंद झाली आहे. (Nandurbar Navapur Rain)

गेल्या २४ तासापासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. काही विभागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील सरपनी नदीला पूर आल्याने राष्ट्रीय महामार्गावरील कच्च्या पुलावरून पुराचे पाणी जात आहे. विसरवाडी पोलिसांनी दक्षता घेत महामार्गावरील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून विसरवाडी सरपनी नदीवरील पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी ठेकेदार जे एम म्हात्रे कंपनीने सुरू केले होते. मोठा पूल अर्धवट असल्याने तात्पुरता कच्चा पूल नदीच्या प्रवाहातून माती टाकून तयार केला आहे. परंतु पूल वारंवार वाहून जात असल्याने. वाहन चालक व स्थानिक नागरिक शेतकऱ्यांना सदर पूल गैरसोयीचा ठरत आहे. त्यामुळे शासनाने आता तरी दखल घेऊन ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

SCROLL FOR NEXT