Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: जुगार अड्यावर धाड; सव्‍वासात लाखाची रोकड जप्‍त

जुगार अड्यावर धाड; सव्‍वासात लाखाची रोकड जप्‍त

दिनू गावित

नंदुरबार : महाराष्ट्र– गुजरात सीमेवरील नवापूर शहरालगत असलेल्या एका हॉटेलच्या बाजूला असलेल्‍या शेडमध्ये जुगारीच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड टाकली. नंदुरबार (Nandurbar) स्थानिक गुन्हे शाखा आणि (Nashik) नाशिक पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाची संयुक्त कारवाई केली असून या धाडीच्‍या कारवाईत सात लाख 23 हजारांची रोकड जप्त केली आहे. (Nandurbar News Raids on gambling dens)

नंदुरबार जिल्ह्यातल्या (Navapur) नवापुर तालुक्यातील बेडकी पाडा गावातील एका शेडमध्ये चालणाऱया अवैध जुगार अड्यावर पोलीसांनी (Police) छापा टाकला आहे. या छाप्यात 7 लाख 23 हजारांची रोडक आणि चार महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांचे पथक आणि नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे.

६० जणांना अटक

यामध्ये जुगार खेळणाऱ्या जवळपास पन्नास पुरुष आणि चार महिलांसह सर्व्हीस देणाऱ्या दहा जणांना देखील अटक करण्यात आली आहे. आज भल्या पहाटे गोपनीय पद्धतीने पोलीसांनी हे छापा सत्र राबविले आहे. या छाप्यानंतर सीमावर्ती भागातील अवैध धंदे पुन्हा चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे छाप्यात गुजरात राज्यातील अनेक जुगारी अडकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : देवीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला! विरारमध्ये टँकरच्या धडकेत माय लेकीचा मृत्यू

DA Hike: खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ; DA मध्ये थेट 'इतक्या' टक्क्यांची वाढ होणार

Mobile Charger: मोबाईलचा चार्जर खराब होण्याआधी कोणती 5 लक्षणं दिसतात?

Maharashtra News Live Update: रत्नागिरी शहरात आजपासून पाणी कपात लागू

Congress Protest Live Update : दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा! दुपारी दीड वाजता इंडिया आघाडी रस्त्यावर, सुप्रीम कोर्टावर महामोर्चा

SCROLL FOR NEXT