MSRTC Bus Saam tv
महाराष्ट्र

नंदुरबार आगारातून पुणे, पंढरपूर बस फेरी

नंदुरबार आगारातून पुणे, पंढरपूर बस फेरी

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : बहुप्रतीक्षेनंतर नंदुरबार आगारातर्फे आजपासून पुणे आणि पंढरपुरसाठी दोन स्वतंत्र बस सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन नंदुरबार (Nandurbar) आगार प्रमुख मनोज पवार यांनी केले आहे. (Pune Pandharpur bus service from Nandurbar depot)

नंदुरबार येथून पुणे (Pune) आणि पंढरपूर येथे जाण्यासाठी संपामुळे (St Strike) बसेस बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुका अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी केली होती. अखेर या मागणीला यश आले.

सायंकाळी सुटेल बस

आज (५ एप्रील) सायंकाळी ५ वाजता नंदुरबार- पंढरपूर तसेच सायंकाळी ५:३० वाजता नंदुरबार- पुणे या दोन लांब पल्ल्याच्या रातराणी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. नंदुरबार– पंढरपूर बस धुळे, मालेगाव, मनमाड, येवला, कोपरगाव, शिर्डी, नगर, टेंभुर्णीमार्गे असून नंदुरबार– पुणे बस नाशिक मार्गे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एसटी महामंडळ विकणार पेट्रोल

RBI नं विकलं 35 टन सोनं? 60 हजार कोटींचं काय केलं?

Pune : पुणे जिल्ह्यात नरभक्षक झाले बिबटे, नागरिकांमधील दहशत कधी संपणार?

Pune crime : पुण्यात अल्पवयीन गँगस्टर्सचा धुमाकूळ, गुन्हेगारी जगतातलं भयान वास्तव, पाहा स्पेशल रिपोर्ट

'लाडकीच्या मनात शिंदेच मुख्यमंत्री'; निवडणुकीच्या तोंडावर निलम गो-हेंचं वक्तव्य, VIDEO

SCROLL FOR NEXT