Nandurbar saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: बालविवाह, बालमजुरी, कुपोषण यावर पावरी भाषेतून जनजागृती

दिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या धडगाव तालुक्यात बालविवाह, बालमजुरी, कुपोषण यासारखे गंभीर विषयांचे प्रमाण जास्त आहेत. यामुळे विधायक भारती स्वयंसेवी सामाजिक संस्थेकडून स्थानिक पावरी व भिल भाषेतून जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या संस्थेकडून गेल्या तीन वर्षापासून 10 गावांमध्ये (Child Marriage) बालविवाह, शिक्षण, कुपोषण (Malnutrition) या विषयांवर जनजागृती अभियान सुरू आहे. यापुढे आणखीन 10 गावांमध्ये या संस्थेच्या माध्यमातून काम सुरू करण्यात आले आहे. (nandurbar news Public awareness on child marriage child labor malnutrition in villages)

धडगाव (Dhadgaon) तालुक्यातील एकमेव बाजारपेठ असलेल्या धडगाव शहरात आठवडी बाजाराच्या दिवशी या संस्थेच्या माध्यमातून विविध पाड्यावरून आलेल्या नागरिकांना बालविवाह १८ वर्षाखालील मुली व २१ वर्षाखालील मुले यांच्या संमतीने झाला. तरी कायद्याने गुन्हा आहे. बालविवाह झाल्यास त्याचे दुष्परिणाम कुपोषण सारख्या गंभीर आजारांमध्ये रूपांतर होतात. त्यामुळे बालविवाह रोखले गेले पाहिजे; तसेच प्रत्येक बालकाने शिक्षण घेतले पाहिजे, बालमजुरी होऊ नये, बाल हक्क, बाल संरक्षण अशा सामाजिक मुद्द्यांवर पोस्टर तसेच विविध उपक्रम राबवून स्थानिक बोलीभाषेतून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. शासन स्तरावर देखील अनेक उपाय योजना केल्या जात असल्या तरी विधायक भारती स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avneet Kaur: गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा... अवनीतचा हटके अंदाज

Maharashtra News Live Updates : जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने थकवा

PM Modi : वर्ध्यातून मोदींनी मविआवर डागलं टीकास्त्र

Buldhana News : दारूबंदी, अवैध धंद्याच्या विरोधात महिलांचा एल्गार; पोलीस स्टेशनला संतप्त महिलांची धडक

Bigg Boss Marathi च्या घरातील सर्वाधिक गाजलेली जोडी कोणती?

SCROLL FOR NEXT