बापरे..ऍक्टिव्हा गाडीत घुसला साप

बापरे..ऍक्टिव्हा गाडीत घुसला साप
Snake
Snakesaam tv
Published On

अंबरनाथ : पावसाळ्याच्‍या दिवसात साप बाहेर येतात व ते कुठेही जावून बसतात. यात बुट व गाडीमध्‍ये साप गेल्‍याचे अनेक व्‍हीडीओ सोशल मिडीयावर व्‍हायरल झालेले पाहिले आहेत. परंतु, अंबरनाथमध्‍ये (Ambarnath) प्रत्‍यक्षात ॲक्‍टीव्‍हा गाडीत साल्‍ घुसल्‍याचे पहायला मिळाले. (ambarnath news snake entered the Activa bike)

Snake
अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार; गर्भवती राहिल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर

अंबरनाथ पूर्वेच्या मेफ्लॉवर गार्डन भागात राहणारे काँग्रेस (Congress) जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या ऍक्टिव्हा गाडीत आज सकाळी साप (Snake) शिरताना वॉचमनने बघितला. यानंतर सर्पमित्र प्रकाश गोहिल यांनी तिथे धाव घेत मेकॅनिकच्या मदतीने गाडी उघडली आणि सापाची सुटका केली.

धामण जातीचा होता साप

तीन फूट लांबीचा हा साप धामण जातीचा बिनविषारी साप होता. सापाला गाडीतून बाहेर काढल्यानंतर साळवे यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com