Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: राजस्‍थानातील घटनेचा निषेध; मटके फोडून भीम आर्मीचे आंदोलन

राजस्‍थानातील घटनेचा निषेध; मटके फोडून भीम आर्मीचे आंदोलन

दिनू गावित

नंदुरबार : राजस्थानमध्‍ये शिक्षकाच्या माठातून पाणी पिल्याने विद्याथ्‍र्याला मारहाण झाली. या मारहाणीत विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाला. यामुळे शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी करत (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यातील दलित समाजाने भीम आर्मीच्यावतीने शहरात आंदोलन केले. तसेच दलित समाजावरील झालेल्या अन्यायाचा निषेध व्यक्त केला. (Nandurbar News Rajasthan Student Death Issue)

राजस्थान (Rajasthan) राज्यातील जालोर सुराणा गाव येथील इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या इंद्रकुमार मेघवाल ९ वर्षीय विद्यार्थ्याने (Student) शिक्षकाच्या माठातून पाणी पिल्याने जातीयवादी विचारसरणीतून शिक्षकाने विद्यार्थ्याला जबर मारहाण केली होती. सदर विद्यार्थ्यांचा अहमदाबाद रुग्णालयात (Hospital) उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आरोपी शिक्षक छेलसिंह यांच्यावर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी. अशी मागणी करत सदर घटनेचा निषेध व्यक्त करत महिलांनी दलित समाजावरील अन्याया विरोधात मातीचे मटके फोडून निषेध व्यक्त केला.

निवेदनाद्वारे राष्‍ट्रपतींकडे मागणी

याव्यतिरिक्त नाशिक, यवतमाळ, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये दलित समाजावर झालेल्या अन्यायाचा उल्लेख करत प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन भीम आर्मीच्यावतीने प्रशासनाला देऊन थेट राष्ट्रपतींकडे मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सर्वोच्च न्यायालयातून बाहेर

Maharashtra News Live Update: धुळे तालुक्यातील आदिवासी बांधवांचे तलावात उतरून आंदोलन

Late night sleeping: रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती? रात्री जागणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे

देशातील हा दुसरा स्वातंत्र्य लढा; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी असं का म्हणाले?

Nagpur Fort : नागपूरजवळ लपलाय ३०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा, कैद्यांसाठी तुरुंग बनलेला विदर्भातील 'हा' किल्ला पाहिलात का?

SCROLL FOR NEXT