Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

गावाच्‍या नावात पाणी पण भर उन्‍हात पाण्यासाठी भटकंती

गावाच्‍या नावात पाणी पण भर उन्‍हात पाण्यासाठी भटकंती; धजापाणी ग्रामस्थांपुढे पाणीटंचाईची समस्या कायम

दिनू गावित

नंदुरबार : सातपुडा दुर्गम भागातील तळोदा तालुक्यातील धजापाणी गावातील फुग्यापाडा, कुवठीपाडा ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जेमतेम सुरू असलेल्या नैसर्गिक झऱ्यातूनच दोन ते तीन किलोमीटर पायी चालत स्‍वतः व गुरांची तहान भागवावी लागत आहे. दिवसभर उन्हाची तीव्रता असल्याने हंडाभर (Nandurbar News) पाण्यासाठी रात्री दऱ्याखोऱ्यातून वाट काढत पाणी आणावे लागत असल्याची आपबीती येथील महिलांनी व्यक्त करत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. (nandurbar news problem of water scarcity persists in front of the villagers)

तळोदा (Taloda) तालुक्यातील धजापाणीसह जवळपास बारा पाड्यांमध्ये आजही रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा पर्याप्त पोहचू शकलेल्या नाहीत. गावापाड्यापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते नसल्याने हातपंपाची सुविधा होऊ शकलेली नाही. तर काही भागात असलेले हातपंप व विहिरी पाण्याअभावी आटल्याने नागरिकांना दऱ्या खोऱ्यातील नैसर्गिक झऱ्यातून तहान भागवावी लागत आहे. जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असलेल्या भागात काय उपाययोजना करता येईल; याबाबत पालकमंत्री के. सी. पाडवी (K C Padvi) यांना विचारले असता जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सदर गावांना तत्काळ काय उपाययोजना करता येतील याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

हातपंपाची योजनाही फेल

धजापाणीसह परिसरातील आदिवासी पाड्यांवर गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र प्रशासनाने अद्याप ठोस उपाययोजना केलेली नाही. कारण हा संपूर्ण परिसर डोंगरदऱ्याचा असल्याने प्रशासनापुढे ही रस्ते, वीज, पाणी या सुविधा पोहोचवणे कठीण ठरत आहे. तसेच शासनाच्या योजनेअंतर्गत हातपंपसाठी केवळ दोनशे फूट बोरवेल करण्याची अट असल्याने अनेक बोरवेलला दोनशे फुटापर्यंत पाणी लागत नसल्याने योजना फोल ठरत आहे. सध्या तरी धजापाणी ग्रामस्थ व जनावरे तीव्र पाणीटंचाईचा सामना करत असून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: परीक्षा फी भरली म्हणून आयोगाची मनसे उमेदवाराला नोटीस

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport : सोलापूरकरांसाठी मोठी गुडन्यूज! 'या' तारखेपासून सुरू होणार विमानसेवा, मुंबई-गोव्याला काही तासात पोहचणार!

Jui Gadkari: जुई गडकरी शुटिंग सुरू असताना सेटवर फावल्या वेळेत काय करते? Video केला शेअर

SCROLL FOR NEXT