Navapur News Bribe Saam tv
महाराष्ट्र

Navapur News: ‘एलसी’साठी लाच; दुरुस्तीसाठी मुख्याध्यापकाने मागितले सोळाशे रुपये

‘एलसी’साठी लाच; दुरुस्तीसाठी मुख्याध्यापकाने मागितले सोळाशे रुपये

साम टिव्ही ब्युरो

नवापूर (नंदुरबार) : सुळी (ता. नवापूर) येथील माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांकडून शाळा सोडण्याचा दाखला व मार्कशीट देण्यासाठी मुख्‍याध्‍यापकाने पैशांची मागणी केली. सोळाशे रुपयांची लाच (Bribe) घेताना मुख्याध्यापक नंदलाल शांताराम शिनकर (रा. साईनगरी, मेन रोड, नवापूर) यास नंदुरबारच्या (Nandurbar) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. (Live Marathi News)

पिलखोड (ता. चाळीसगाव) येथील तक्रारदाराने २०१७- २०१८ या वर्षी सुळी येथील माध्यमिक विद्यालयात दहावीचे शिक्षण घेतले आहे. तक्रारदार हे त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला व मार्कशीट घेण्यासाठी माध्यमिक विद्यालय, सुळी येथे गेले. यावेळी मुख्याध्यापक नंदलाल शिनकर यांने त्यांच्याकडून १४ जानेवारीला पाच हजार रुपये घेऊन शाळा सोडल्याचा दाखला दिला.

दाखल्‍यावर नाव चुकीचे

तक्रारदार यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर त्यांच्या आईचे नाव चुकीचे होते. चुकीचे नाव दुरुस्त करून घेण्यासाठी व दहावीचे मार्कशीट घेण्यासाठी तक्रारदाराने मुख्याध्यापकांना पुन्हा विनंती केली. मुख्याध्यापक शिनकर याने तक्रारदाराकडून शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील आईचे नाव दुरुस्त करून देणे व नाशिक येथील बोर्ड कार्यालयातून त्यांचे मार्कलिस्ट आणून देण्याच्या मोबदल्यात पुन्हा दोन हजारांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्याशी संपर्क साधला. यानंतर सापळा रचून तक्रारदाराकडून सोळाशे रुपयाची लाच स्वीकारताना मुख्याध्यापक शिनकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ज्ञान पाजळणाऱ्या पुणेकरांना परदेशी नागरिकानं शिकवला धडा|VIDEO

माझ्या बायकोला घरी पाठवा हो....सासूच्या पायावर लोटांगण घालून जावई धायमोकळून रडू लागला, Viral Video बघून काय म्हणाल?

Maharashtra Live News Update: नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी,बॉम्बशोध पथक, डॉग स्कॉड जिल्हा न्यायालयात दाखल

अकरा वर्षाच्या मुलाचा विचित्र प्रकार, शाळेत पुस्तकांसोबत आणलं कंडोम, मुख्याध्यपकांचा चढला पारा

Director Arrested: प्रसिद्ध दिग्दर्शकाला जेल; ३० कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात केली अटक, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT