Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : खेतीया- विसरवाडी महामार्गाचे निकृष्ट काम; कॉंक्रीट रस्त्याला काही दिवसातच भेगा

Nandurbar News : महामार्गावर मधोमध भेगा असल्याने रस्त्याने वेगाने जाणाऱ्या वाहनाची चाके या भेगांच्यामध्ये अडकवून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे
नंदुरबार
 :  केंद्र शासनाच्या वतीने विसरवाडी- खेतीया महामार्ग दोनपदरी करण्याचे काम सुरु आहे. या मार्गाचा (Nandurbar) कोळदा ते खेतीया या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र या महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे झाले असून अवघ्या काही दिवसातच नवीन काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्या आहेत. (Latest marathi News)

नवीन झालेल्या कामाला शहादा (Shahada) शहराजवळ आणि इतर ठिकाणी रस्त्याचा मधोमध मोठ्या भेगा पडल्या आहेत तर काही ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. सदर महामार्गावर मधोमध भेगा असल्याने रस्त्याने वेगाने जाणाऱ्या वाहनाची चाके या भेगांच्यामध्ये अडकवून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या भेगांमध्ये डांबर टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र पुन्हा भेगा पडत आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कामाच्या चौकशीची मागणी 

नव्या महामार्गावर मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यासोबत महामार्गावर असलेल्या दुभाजकावर काटेरी झुडपे आहेत. यामुळे रस्त्याच्या निकृष्ट कामांची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी शरद पावर गट आणि इतर संघटनाच्या वतीने आंदोलनचा इशारा दिला आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांची देशी दारू विक्रीच्या ठिकाणी छापेमारी

संतापजनक! आधी वडील, काका नंतर शेजारच्या आजोबानं १२ वर्षीय मुलीला वासनेचा बळी बनवलं, धक्कादायक कृत्यानं गावच हादरलं

ठाकरे बंधू एकत्र, भाजपच्या रणनीतीत बदल, ठाकरेंची युती शिंदेंच्या पथ्यावर

Friday Horoscope : तुमच्या साधेपणाचा दुसरा कोणी फायदा घेण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांनी काळजीपूर्वक निर्णय घ्या, अन्यथा

शिंदे वर्षावर जाऊन फडणवीसांची मालिश करता का? संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT