Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : पर्यटन विकासाच्या निष्कृष्ट दर्जाचा बांधकाम; कामाच्या चौकशीसाठी घंटानाद

Nandurbar News : बांधकाम विभागाने निष्कृष्ट दर्जाचे काम केले असून त्या परिसरात लावण्यात आलेल्या मौल्यवान साहित्य चोरीला गेले होते.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नवापूर नगरपरिषद हद्दीत पर्यटन विकास अंतर्गत झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. यात झालेल्या भ्रष्ट्राचाराची चौकशी व्हावी; अशी मागणी (Nandurbar) अनेकदा करण्यात आली. मात्र याची (Navapur) दखल घेतली जात नसल्याने सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांनी आज घंटानाद आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला आहे. (Breaking Marathi News)

नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर नगरपरिषद हद्दीतील मरिमाता परिसरात पर्यटन विकास अंतर्गत १ कोटी १० लाख रुपये मंजूर झाले होते. मात्र बांधकाम विभागाने निष्कृष्ट दर्जाचे काम केले असून त्या परिसरात लावण्यात आलेल्या मौल्यवान साहित्य चोरीला गेले होते. त्यासंदर्भात संबंधित अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करीत गुन्हा दाखल करून भ्रष्टाचाराची (Scam) उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तसेच ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांनी वेळोवेळी केली.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तोपर्यंत घंटानाद सुरूच राहणार 

शासनाकडे तक्रार करून देखील आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने सामजिक कार्यकर्त्यांने बेमुदत घंटानाद आंदोलनाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होत नाही; तोपर्यंत घंटानाद आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT