Surat Nagpur Highway Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: पावसाच्‍या विश्रांतीनंतर अखेर विसरवाडी पुलावरून एकेरी वाहतूक सुरू

पावसाच्‍या विश्रांतीनंतर अखेर विसरवाडी पुलावरून एकेरी वाहतूक सुरू

दिनू गावित

नंदुरबार : नवापूर तालुक्यातून जाणारा आंतरराज्य नागपूर– सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर विसरवाडी गावाजवळ अतिवृष्टीमुळे सरपनी नदीवरील तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेला पूल वाहून गेला होता. यामुळे महामार्ग ठप्प झाला होता. दरम्यान गेले तीन दिवस नवापूर (Navapur) तालुक्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू असल्याने नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे पूल दुरुस्तीसाठी अथक प्रयत्न करावे लागले. माती टाकून दुरुस्त केलेला पूल पुन्हा वाहून गेल्यानंतर चौथ्या दिवशी पावसाचा जोर कमी झाल्याने ठेकेदाराकडून सदर पुलावर माती टाकून तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त करण्यात आल्याने महामार्ग प्रशासनाने पुलावरून एकेरी वाहतूक सुरू केली आहे. (Nandurbar News One way traffic is finally starting from Visserwadi bridge)

दिवसभरातून तीन हजारपेक्षा अधिक वाहने ये– जा करत असल्याने तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेल्या कच्चा पुलावरून (Accident) अपघात होऊ नये; यासाठी महामार्ग प्रशासनाने फक्त एकेरी वाहतूक सुरू ठेवावी असे आवाहान केले आहे. अखेर चौथ्या दिवशी सुरत– नागपूर राष्ट्रीय महामार्ग (Surat Nagpur Highway) अवजड वाहनांसाठी सुरू झालेला आहे. मात्र पावसाचा जोर वाढल्यास पुरामुळे सदर पूल पुन्हा वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आठ वर्षांपासून काम सुरू

महामार्ग प्रशासनाने वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे. परंतु गेल्या आठ वर्षापासून नवापूर तालुक्यात सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जा आणि संथ गतीने सुरू असल्यामुळे वारंवार वाहन चालक व सर्व सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना गैरसोय निर्माण होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2025 Auction साठी 1574 खेळाडूंनी नोंदवलं नाव! केव्हा, कुठे आणि कधी होणार ऑक्शन? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates : शिवसेना ठाकरे गटाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृताच्या घरी नवीन पाहुणा कधी येणार? प्रेग्नेंसीबाबत दिली महत्त्वाची अपडेट

US Election Result 2024: डोनाल्ड ट्रम्प Vs कमला हॅरिस, आतापर्यंत कोणत्या राज्यात कोण विजयी?

Government Job: भारत सरकारच्या या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार;अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT