नंदुरबार : भवरकडून खर्डी नदीमार्गे तळोदाकडे दुचाकीवरून येणाऱ्या कळमसर मोहिदा येथील ४० वर्षीय व्यक्तीच्या अंगावर झाड उलमडून पडल्याची घटना घडली आहे. दरम्यान यात सदर व्यक्ती थोडक्यात बचावला असून त्याला हाता पायाला (Nandurbar) मार लागला असून तो गंभीर जखमी झाला आहे. (nandurbar news One person was seriously injured when a tree fell on his body)
तळोद्यात (Taloda) पाच वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वाऱ्यासह पावसाला (Rain) सुरुवात झाली होती. वादळी वाऱ्याचा जोर इतका होता की, रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली. दुचाकीवरून भवरकडून खर्डी नदी मार्गे तळोदाकडे येणाऱ्या रवींद्र गुलाब ठाकरे (वय ४०, रा. कळमसर मोहिदा) हा तरुण कामे आटपून तळोदाकडे येत होता. या दरम्यान अचानक त्याच्या दुचाकीवर झाड कोसळले. या घटनेत चालक झाडाखाली अडकून पडला होता.
नागरीकांच्या मदतीतून वाचले प्राण
दरम्यान झाड कोसळल्याचा आवाज झाल्याने परिसरात एकच घबराट पसरली. रस्त्यावर जाणारे प्रवासी व जवळच असलेले धाणकावाडा येथील नागरिकांनी धावपळ केली. झाडाखाली सापडलेले दुचाकीवरून त्या तरुणास बाजूला काढले व त्यास रुग्णवाहिकेला प्राचारण करून तात्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.