नंदुरबार : शहादा शहरातील मंगलमूर्तीनगरात झोका खेळत असताना दोरीत अडकून ९ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकीकडे परिवारात मुलगी जन्माला आल्याचा आनंद साजरा होत असताना दुसरीकडे बालकाचा दुर्देवी अंत (Death) झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. (nandurbar nine year old boy died after getting stuck in a rope while playing Zoka)
शहाद्यातील (Shahada) मुनेश लखमीचंद अग्रवाल यांचा नातू व ईशान यांचा चिरंजीव यश अग्रवाल हा घरात दोरीच्या झुल्यावर खेळत होता. अचानक त्यावरून खाली पडल्याने झुल्याचा दोरीचा फास त्याच्या मानेभोवती आवळल्याने तो जमिनीवर बेशुद्ध पडला होता. या घटनेकडे अचानक घरकाम करणाऱ्या बाईचे लक्ष गेले. त्यावेळी यश खाली पडलेला दिसला. तिने घरातील लोकांना याची कल्पना दिली. (Nandurbar News) लागलीच घरची सर्व मंडळी धावून गेल्यानंतर त्याच्या मानेवर झोक्याचा दोरीचा गळफास लागलेला दिसला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. (Police) पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या पथकाने घटनास्थळी भेट सदर घटनेची पाहणी केली.
चुलत भावाच्या घरी मुलीच्या जन्माचे स्वागत
दरम्यान, घटना घडली त्यावेळी संपूर्ण अग्रवाल कुटुंब हे त्यांच्या घरासमोरील चुलत भावाच्या घरी पुतण्याला मुलगी झाल्याने त्या निमित्ताने घरगुती छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कुटुंबीयांसोबत नातेवाईक उपस्थित होते. एकीकडे मुलीच्या स्वागताची तयारी सुरू असताना तर दुसरीकडे यशसोबत अशी दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शहादा पोलिसात राजेंद्र अग्रवाल यांच्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.