Nandurbar NCP Saam tv
महाराष्ट्र

पंतप्रधान मोदींच्या फलकाजवळ केक कापून राष्ट्रवादीचे 'एप्रिल फुल' आंदोलन

पंतप्रधान मोदींच्या फलकाजवळ केक कापून राष्ट्रवादीचे 'एप्रिल फुल' आंदोलन

दिनू गावित

नंदुरबार : कोट्यवधी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देऊ, महागाई कमी करण्यात येईल असे नानाविध आश्वासने देऊन केंद्रातील भाजप सरकारने जनतेला 'एप्रिल फुल' बनवल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला. या विरोधात नंदुरबार (Nandurbar) शहरातील मंगळ बाजारातील पेट्रोल (Petrol) पंपाजवळ आंदोलन करण्यात आले. (nandurbar news NCP's April Fool movement by cutting a cake near PM narendra Modi banner)

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या फलकावरील प्रतिमेजवळ केक कापून एप्रिल फूलसह जागतिक फेकू दिन म्हणून साजरा केला. भाजप (BJP) सरकारने दिलेली आश्वासने न पाळता जनतेची फसवणूक केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते ॲड. राऊ दिलीपराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष लल्ला मराठे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंवरून मविआत बिघाडी; मुंबईत कॉग्रेसचा स्वबळाचा नारा?

Mahayuti: महायुतीचं ठरलं! मुंबईत एकत्र,राज्यात स्वतंत्र, विजयाची रणनिती काय?

Cough Syrup: कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव, रुग्णालयातच घडला धक्कादायक प्रकार

Microwave: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने होतात 'हे' परिणाम

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

SCROLL FOR NEXT