सागर निकवाडे
नंदुरबार : नवापूर शहरातील अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. यामुळे शहरातील (Navapur) एका हमालाने पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जपत रस्त्यावर खड्डे बुजवुन आदर्श निर्माण केला आहे. (Tajya Batmya)
नवापूर शहरातील विविध भागातील जुने व नुकतेच बनवलेले रस्त्यांचे बारा वाजले असून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडून चिखलमय (Nandurbar) परिस्थिती दिसून येत आहे. रस्ताची अक्षरशः चाळण झाली आहे. यामुळे व्यापारी, रहिवाशी तसेच वाहन धारकांना याच्या त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे अपघातही होत असून घाणीचे साम्राज्य (Navapur City) पसरले आहे. नागरिक पार वैतागले आहेत. नगरपालिकेला याबाबत लेखी व तोंडी तक्रार करूनही रस्त्यावरील खड्डे न बुजल्यामुळे अखेर नगरपालिकेचे काम चक्क शहरातील चंदू हमाल करीत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
आता तरी नगरपालिका करेल का?
नवापूर शहरातील विविध भागात नागरी सुविधांच्या फज्जा उडाला असून कर भरूनही नगरपालिका आम्हास सुविधा देत नसेल तर ही शर्मजनक बाब असल्याचे संतप्त प्रतिक्रिया नवापूरचा व्यापारीनी दिली आहे. चंदू हमाल यांच्या परिश्रमामुळे रस्त्यावरील खड्डे बुजले जात आहे. कदाचित ही पहिली घटना असावी की जे काम नगरपालिकेने करायला पाहीजे; ते काम चक्क एक हमाल करतो आहे. शहरातील विविध भागातील चिखलमय रस्त्यावरील खड्डे नगरपालिका बुजत नसल्याने ते काम चंदु हमालमुळे बुजले जात आहे. हे दृश्य पाहुन नगरपालिका, नगरसेवक काय विचार करत असतील याचा जवाब त्यांनीच द्यावा; अशी मागणी रहिवाशी करत आहे. चंदू हमालने केलेल्या सामाजिक कार्यामुळे वाहन चालकाकडून कौतुक करण्यात येत आहे. मात्र अद्यापही संबंधित विभाग झोपेचे सोंग घेऊन निद्रावस्थेत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.