महाराष्ट्र

हायव्‍होल्‍टेज तारेला स्‍पर्श होवून टँकर चालकाचा मृत्‍यू

हायव्‍हॉल्‍टेज तारेला स्‍पर्श होवून टँकर चालकाचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

नवापूर (नंदुरबार) : शहरातील दूरध्वनी कार्यालयासमोर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी सिमेंट घेऊन येणारा टँकर चालकाचा हाय व्होल्टेज असलेल्या ३३ के व्ही विद्युत तारेला शॉक लागून जागीच मृत्यू झाला. सदर चालक हा सोनगीर (ता. धुळे) येथील रहिवासी आहे. (nandurbar-news-navapur-fourway-work-Tanker-driver-dies-after-high-voltage-wire-current)

नवापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नरडाणा येथून सिमेंट कंपनीच्या प्लांटमधून ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून सुटे सिमेंट वाहन चालक भगवान बडगुजर टँकर (क्र. एमएच ०४, एफपी ६१०४) घेऊन आला. दुपारच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणाचे कन्ट्रक्शन करणारी कंपनीचे सुटे सिमेंट खाली केले.

झाकण उघडे राहिल्‍याने झाला घात

टँकरवरील झाकण उघडे राहून गेल्याने झाकण बंद करण्यासाठी चालक वाहनावर चढला असता वरील हायव्होल्टेज असलेल्या ३३ केव्ही विद्युत तारेला चालकाचा स्पर्श झाला. यात चालक भगवान बडगुजर (वय ४५, रा. सोनगीर धुळे) यांना जोरदार झटका बसला असता ते टँकरवरून खाली फेकले गेले. यात त्‍यांचा जागीच मृत्यू झाला. नवापूर येथील पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळं, युवराज परदेशी, योगेश तनपुरे यांनी १०८ रुग्णवाहिका बोलावून उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्‍यास मृत घोषित केले. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळं करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडेच्या न्यायासाठी आंदोलन

Black Coffee With Ghee Benefits: ब्लॅक कॉफीमध्ये हे ३ पदार्थ मिसळून प्या; शरीराला मिळतील ७ आरोग्यदायी फायदे

100 कोटी रुपयांचा व्यवहार अन् 38 पथकांची 38 ठिकाणी धाडी,1424 बँक खाती फ्रिज; काय आहे सरकारचं ऑपरेशन ट्रायडेंट?

Diwali Kitchen Cleaning Tips: दिवाळीच्या साफसफाईत किचनच्या 'या' 7 जागांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पुन्हा काँग्रेसमध्ये येणार? संतप्त प्रतिक्रिया देत सर्वच सांगितलं

SCROLL FOR NEXT