Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: कोल्हापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलीस अलर्ट मोडवर; अकोल्‍यातही जनजागृतीचे पोस्टर

कोल्हापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलीस अलर्ट मोडवर; अकोल्‍यातही जनजागृतीचे पोस्टर

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

नंदुरबार : कोल्हापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस अलर्ट झाले आहे. सोशल मीडियावर (Social Media) वादग्रस्त पोस्ट व्‍हायरल करू नका आणि जातीयतेढ निर्माण होईल असे पोस्टर आणि लिखाण करू नका; असे आवाहन (Nandurbar) नंदुरबार पोलिसांनी सोशल मीडियाद्वारे केले आहे. (Maharashtra News)

कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये (Kolhapur) बंदची हाक दिली होती. याच पाश्‍र्वभुमीवर नंदुरबारमध्‍येही पोलिस प्रशासन अलर्ट आहे. कुठल्याही समाजविघातक कृत्यात सहभागी होऊ नका; अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील नंदुरबार पोलिसांनी सोशल मीडियाद्वारे तरुणांना केला आहे.

अकोला शहरात झळकले जनजागृतीचे पोस्टर

सोशल मीडियावरील एका पोस्टने अख्या शहराला वेठीस धरल्याचा अनुभव नुकताच अकोलेकरांना आला. या पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांनी आता वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांमध्ये सोशल मीडियावरील मचकुरांबाबत सावधानता (police) बाळगण्याबाबत जनजागृती सुरू केली आहे. अकोला शहर हे अतिशय संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. एका सोशल मीडियाच्या एका पोस्टमुळे अकोल्यात मोठा हिंसाचार झाला होता. शहरात जनजागृती करण्यासाठी सोशल मीडिया हाताळताना कोणत्या चुका होऊ नये; म्हणून जनजागृती करणारे माहितीचे बॅनर्स बनवून शहरातील मुख्य ठिकाणी दर्शनी भागावत लावण्यात आले आहेत. नागरीकांना या माध्यमातून माहिती देत जनजागृती केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zumba: वजन कमी करण्यासाठी झुंबा खरचं फायदेशीर आहे का?

SSC Exam : बोर्डाच्या कॉपीमुक्त परीक्षा मिशनचा फज्जा, दहावीचा पेपर ३ दिवस आधीच फोडला

LPG Crisis: जनता 'गॅस'वर, हॉटेल चुलीवर, हॉटेलला आता लाकडं, कोळशाचा आधार

Thursday Horoscope : मानसिक तणाव जाणवेल; ५ राशींच्या लोकांना वाणीवर संयम ठेवावा लागेल, अन्यथा...

Maharashtra Live News Update : पुढील दोन दिवस उन्हाचा कडका, तापमान 40 पार जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT