Nandurbar News Saam Digital
महाराष्ट्र

Nandurbar News : शेततळ्याचं अनुदान मिळवून देण्यासाठी शेतकऱ्याकडे मागीतली २५ हजारांची लाच; कृषी अधिकारी रंगेहाथ सापडला जाळ्यात

Sandeep Gawade

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याचे शेततळे अनुदान मंजूर करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील मंडळ कृषी अधिकाऱ्याने लाच २५ हजारांची लाच मागीतली होती. या प्रकरणी नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत संबंधित अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं आहे.

नवापूर तालुक्यातील तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावावर असलेले शेततळ्याचे अनुदान मिळवून देण्यासाठी 20 फेब्रुवारी 2024 रोजी 25 हजारांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती 20 हजारांची मागणी केल्याप्रकरणी आज कारवाई करण्यात आली आहे.याप्रकरणी कृषी मंडळ अधिकारी,सागर अशोक अहिरे वय 33, याला नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याचा विरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवापूर तालुक्यात तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस निरीक्षक, या बड्या अधिकाऱ्यासह लाचेची मागणी, लाच घेणे अशी प्रकरणे वाढत असून आता तालुका कृषी कार्यालयात देखील भ्रष्टाचार वाढत चालला आहे. भ्रष्टाचाराचा सामना बळीराजाचा देखील करावा लागत आहे. नवापूर तालुक्यातील कोणताही शासकीय अधिकारी कर्मचारी पैशांची मागणी करत असेल तर त्यासंदर्भात थेट नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPSC Success Story : वाह रे पठ्ठ्या! २ वेळा JEE पास करून IIT सोडलं; UPSC उत्तीर्ण होऊन IAS पदाचा राजीनामा, कोण आहे 'हा' जिगरबाज तरूण?

Chembur Fire News : चेंबूरमधील आग दुर्घटनेची CM शिंदेंकडून पाहणी; मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहिर

Curd Rice Recipe:रोजच्या पोळी भाजीचा कंटाळा आलाय? मग करा झटपट कर्ड राईस

Jalgaon Crime : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; जळगावतील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : संभाजी राजे अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या शोधासाठी रवाना

SCROLL FOR NEXT