Nandurbar news Saam tv
महाराष्ट्र

नवापूर अतिवृष्टीतील नुकसानीची आमदारांकडून पाहणी; पुल दुरूस्‍तीच्‍या सुचना

नवापूर अतिवृष्टीतील नुकसानीची आमदारांकडून पाहणी; पुल दुरूस्‍तीच्‍या सुचना

दिनू गावित

नंदुरबार : नवापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग तसेच ग्रामीण भागातील दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच अनुषंगाने नवापूर (Navapur) विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीषकुमार नाईक यांनी मतदार संघात शेती, रस्ते, पूल नुकसान झालेल्या भागाचा अधिकाऱ्यांसोबत (Nandurbar News) दौरा करून पाहणी केली. दुरुस्त करून नागरिकांच्या दळणवळणाची सोय करावी असे आदेश दिले आहे. (nandurbar news MLA shirishkumar naik inspect Navapur heavy rains)

नवापूर तालुक्यातील नागण मध्यम प्रकल्प भरडू धरणावरील केळी- केवडीपाडा अंतर्गत नदीवरील पुलाची रस्त्यावरील साईट पट्ट्यांना तडा गेल्याने रस्तावरील भराव दाबला गेला आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार सदर पूलाचे व रस्त्यावरील भरावाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आमदारांसोबत ठेकेदार आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांनीही पाहणी केली. यावेळी अपघात टाळण्यासाठी तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे.

दुरूस्‍तीच्‍या सुचना

निमदर्डा गावाजवळील अर्धवट पुलाचे कामामुळे पर्यायी कच्चा पूल वाहून गेल्याने दहा गावांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला होता. या ठिकाणीही आमदारांनी पाहणी केली व ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. एकूणच नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा आणि नवापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती रस्ते व घरांचे नुकसान झाले आहे. आणि प्रशासनाने नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नशा डोक्यात गेली, पोटच्या मुलानं आई- वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाड घातली, दागिने घेऊन आरोपी फरार

Bachhu Kadu: कडूंचं वाहन फोडा आणि 3 लाख मिळवा; कोणी दिलं प्रतिआव्हान | VIDEO

थाटामाटात लग्न केलं, हनिमूनच्या काही तासाआधीच नवऱ्याचा मृत्यू; नववधूचं संसार थाटण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं

Saree Waist Chain Designs: पारंपारिक साडीलूकवर शोभून दिसतील असे कमरबंद, युनिक आणि ट्रेडिंग डिझाइन्स

Crime: मुलांना घराबाहेर काढायची,नंतर बॉयफ्रेंडसोबत एका खोलीत...; प्रेमसंबंधाला विरोध केल्यानं नवऱ्याला संपवलं

SCROLL FOR NEXT