Rajesh Padvi Saam tv
महाराष्ट्र

आमदार राजेश पाडवींनी केला एसटीतून प्रवास; विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतल्‍या समस्या

आमदार राजेश पाडवींनी केला एसटीतून प्रवास; विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतल्‍या समस्या

दिनू गावित

नंदुरबार : नंदूरबार जिल्ह्यातील शहादा– तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी तळोदा ते अक्कलकुवा (Akkalkuwa) दरम्यान रस्त्यावर प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या एसटी महामंडळाच्या माध्यमातून समस्या सोडविण्यासाठी व अडीअडचणी दूर करण्यासाठी स्वतः अक्कलकुवा ते तळोदा या (ST Bus) एसटी महामंडळाच्या बसमध्ये विद्यार्थ्यांसमवेत प्रवास केला. यादरम्यान येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. (Nandurbar News MLA Rajesh Padvi)

शालेय विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एसटी महामंडळाच्या (MSRTC) वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देत त्यांनी उपाययोजना करण्याची महामंडळाकडे मागणी केली आहे. तालुक्यातील (Nandurbar) गाव पाड्यासमवेत खेड्यावरील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशी समस्या घेऊन काही दिवसांपूर्वी विद्यार्थी आमदार राजेश पाडवी यांना भेटले होते. आज स्वतः आमदार राजेश पाडवी यांनी अक्कलकुवा ते (Taloda) तळोदा या प्रवासादरम्यान एसटी बसमध्ये विद्यार्थ्यांसोबत प्रवास करत समस्या जाणून घेतल्या. गावपाड्यावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी बसने प्रत्येक ठिकाणी हात दिल्यावर थांबावे जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल. अशा सूचना महामंडळाला केल्या आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganga water: गंगा नदीचं पाणी कधीच खराब होत नाही का?

Famous Influencer : सोशल मीडियावर श्रीमंतीचं प्रदर्शन; Reel मधून पैसा अन् सोनं दाखवलं, प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

Maharashtra Drought: राज्यातील कोणत्या 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर, तुमच्या गावाचा समावेश आहे का? पाहा संपूर्ण यादी

Maharashtra News Live Update: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

7 Best Oils for Hair Growth: केसांच्या वाढीसाठी 7 तेल

SCROLL FOR NEXT