Rajesh Padvi Saam tv
महाराष्ट्र

Rajesh Padvi News : चिमुकल्यांची चार किलोमीटरची पायपीट होणार कमी; आमदार पाडवींनी पायपीट करत जाणून घेतल्या समस्या

Nandurbar News : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही सातपुड्याचा दुर्गम भागातील काही गावांना अजूनही रस्ते आणि शालेय इमारती सारख्या सुविधा नाही

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागात आजही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. अशाच तळोदा (Taloda) तालुक्यातील बिलीच्या पाडा येथे जाण्यासाठी रास्ता नाही. तसेच सुसज्ज अंगणवाडीची इमारत  नसल्याने मुलांना देखील (Nandurbar) पायपीट करत जावे लागत असते. याबाबत आमदार राजेश पाडवी यांनी चार किलोमीटरची पायपीट करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. (Tajya Batmya)

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही सातपुड्याचा दुर्गम भागातील काही गावांना अजूनही रस्ते आणि शालेय इमारती सारख्या सुविधा नाही. तळोदा तालुक्यातील बिलीचापाडा येथे नागरिकांना रस्ता आणि अंगणवाडी इमारती अभावी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या गावातील लहानग्या मुलांना अंगणवाडीसाठी चार किलोमीटरची पायपीट करावी लागते. तसेच मूलभूत सुविधांसाठी ही या गावकऱ्यांचा संघर्ष सुरू होता. गावाला रस्ता नाही या गोष्टी तळोदा- शहादा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांना समजल्या. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आमदार पोहचले पाड्यावर 

आमदार पाडवी यांनी स्वतः चार किलोमीटर पायपीट करत या पाड्यावर जात नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. तसेच या ठिकाणी विकास काम करताना वनविभागाचा जो अडथळा होता, त्या संदर्भात वरिष्ठ विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या ठिकाणचा रस्त्याचा आणि अंगणवाडी इमारतीचा प्रश्न मार्गी लावला. ७५ वर्षांनी रस्त्याच्या प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुम्हीही प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय? तर आत्ताच व्हा सावध! शरीरावर होऊ शकतात ५ गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update : घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७ वर पोहचला

आमदार विकून मुख्यमंत्रिपद दिलं अन् त्याला लोकशाही म्हणता?; कपिल सिब्बल भडकले,आयोगाची कोंडी, युक्तिवादाचा शब्द ना शब्द

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन! शाळांना सुट्टी जाहीर, कार्यक्रम रद्द; राजकारणात शोककळा

Maharashtra Government: विद्यार्थ्यांना दिलासा! भरती परीक्षा प्रक्रियेत सुधारणा होणार, फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT