के. सी. पाडवी 
महाराष्ट्र

अतितिव्र कुपोषित बालकांच्या उपचारासाठी विशेष उपाययोजना : मंत्री ॲड. के. सी. पाडवी

जिल्ह्यात १ लाख ११ हजार ८५७ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून २ हजार ६१६ अतितीव्र कुपोषित आणि १३ हजार २५७ मध्यम कुपोषित बालके आढळली आहेत.

दिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या वाढलेल्या संख्येवर व उपचाराबाबत साम टीव्हीने वारंवार वाचा फोडली आहे. यामुळे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी कुपोषित बालकांच्या उपचारासाठी उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य विभागाची तातडीची बैठक घेत जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी व्यापक उपाययोजनांवर भर द्यावा आणि अतितिव्र बालकांचे पोषण आणि उपचाराकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कुपोषणाबाबत आयोजित आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना त्‍यांनी सुचना दिल्‍या. कुपोषण कमी करण्यासाठी असलेल्या शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी अंगणवाडी स्तरापर्यंत सूक्ष्म नियोजन करावे. गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या पोषणाकडेही विशेष लक्ष द्यावे. कुपोषित बालकाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतरही त्याच्या प्रकृतीकडे पुढील काही काळ सातत्याने लक्ष देण्याच्‍या सुचना केल्‍या.

अडीच लाखाहून अधिक अतितीव्र कुपोषित

जिल्ह्यात १ लाख ११ हजार ८५७ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून २ हजार ६१६ अतितीव्र कुपोषित आणि १३ हजार २५७ मध्यम कुपोषित बालके आढळली आहेत. कुपोषित बालकांवर उपचार करण्यासाठी २६ प्राथमिक आरोग्य केंद्रात बाल उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - मुंढवा येथील जमीन प्रकरणात शितल तेजवानी याना अटक होणार

Night Cravings: रात्री झोपण्याआधी खाण्याची इच्छा होते? मग हे पदार्थ खल्ल्याने होऊ शकतात गंभीर आजार, वेळीच व्हा सावधान

आता माझा बळी जाणार, आणखी एका डॉक्टर महिलेचा खळबळजनक VIDEO; भाजप आमदाराचंही नाव

राज ठाकरे संजय राऊतांच्या भेटीला; तब्येतीची केली विचारपूस|VIDEO

Bharat Taxi App : स्वस्तात मस्त प्रवास! भारत सरकारची पहिली टॅक्सी सेवा सुरु; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT