महाराष्ट्र

धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील आमचूर प्रकल्पाला मान्यता

धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील आमचूर प्रकल्पाला मान्यता

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : मानव विकास मिशन अंतर्गत धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात आमचूर उत्पादक आदिवासींच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी 'आमचूर निर्मिती व विक्री' हा प्रकल्प शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

मानव विकास मिशन अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यापूर्वी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत या प्रकल्पाचे आधारभूत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच प्रकल्प राबविल्यानंतर त्याची उपयुक्ततादेखील सर्वेक्षणाच्या माध्यमातून तपासण्यात येणार आहे. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात आमचूर उत्पादक आदिवासींच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी महामंडळामार्फत वन धन केंद्र आणि महिला ग्राम संघामार्फत हा प्रकल्प राबविण्यासाठी महामंडळ प्रयत्न करीत आहे. या दोन्ही तालुक्यात तयार होणाऱ्या आमचूराला त्याच्या विशिष्ट गुणवत्तेमुळे देशांतर्गत आणि देशाबाहेर मोठी मागणी आहे. या व्यवसायात दरवर्षी मोठी आर्थिक उलाढाल होत असते. परंतु या संधीचा फायदा व्यापारी आणि आमचूर प्रक्रीया उद्योगाधारीत कंपन्या घेतात.

आदिवासी कुटुंबांना होणार लाभ

आदिवासी बांधवांना या व्यवसायाचा लाभ होण्यासाठी स्थानिक पातळीवर आमचूर निर्मिती आणि विक्री झाल्यास त्याचा आदिवासी कुटुंबांना लाभ होणार आहे. म्हणूनच ॲड. पाडवी आणि शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांनी धडगाव आणि अक्कलकुवा परिसरात असे केंद्र विकसीत करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले होते.

उत्‍पन्‍नात होवू शकते वाढ

धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात आंब्यांची झाडे मोठ्या प्रमाणात असून दुर्गम- डोंगराळ भागातील नागरिकांसाठी आमचूर तयार करणे हे उपजिविकेचे महत्वाचे साधन आहे. कच्च्या स्वरुपात तयार झालेले हे आमचूर बाहेरील राज्यातील व्यावसायिक विकत घेऊन त्यावर प्रक्रीया करतात. स्थानिक स्तरावर प्रक्रीया व विक्री केंद्र झाल्याने आमचूराला चांगला दर मिळून आदिवासी कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

अशी असेल योजना

व्यक्तिगत लाभार्थी, आदिवासी समाज, संस्था यांचा प्रकल्पात १० टक्के स्वनिधी असेल, तर ९० टक्के शासनाचा हिस्सा असेल. ६ कोटी ५ लाखाच्या प्रकल्पासाठी ५ कोटी ४४ लक्ष ५० हजार एवढ्या शासनाच्या हिश्यास मान्यता देण्यात आली आहे. उर्वरीत ६० लक्ष ५० हजार स्वनिधीतून गोळा होईल. त्यापैकी आमचूर खरेदीसाठी २ कोटी खेळेत भांडवल, आमचूर उत्पादनासाठी अर्थसहाय्य ६० लाख, आमचूर प्रक्रीया, विक्री व वाळविणे यासाठी २ कोटी, ग्रामीण स्तरावर साठवणुकीसाठी वन धन केंद्र किंवा ग्राम संघ यांना १० लाख, आदिवासी कुटुंबातील सदस्यांना स्वच्छ आमचूर निर्मिती, सौर वाळवणी यंत्राचा वापर व आमचूरावर प्रक्रीया करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी ८० लाख आणि ५५ लाख रुपये व्यवस्थापन खर्च असेल.

आदिवासी कुटुंबातील सदस्यांसाठी स्वच्छ आमचूर निर्मिती, सौर वाळवणी यंत्राचा वापर व आमचूरावर प्रक्रीया याबाबत प्रशिक्षण देणे अपेक्षित असून पहिल्या टप्प्यात ३०० सभासदांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

– ॲड. के. सी. पाडवी, पालकमंत्री, नंदुरबार जिल्हा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: मलकापूर विधानसभेत काँग्रेसचे राजेश एकाडे होणार आमदार? पाहा Exit Poll

Bhandara Crime : धक्कादायक.. अपशब्द बोलल्याने मालकाने केली कामगाराची हत्या; नदीत फेकला होता मृतदेह

Winter Wedding Tips: हिवाळ्यात लेहेंगा आणि साडीसह वापरा अशी जॅकेट आणि शाल ... ज्याने येईल ट्रेंडी लुक; थंडीपासूनही होईल बचाव

Saam Exit Poll: शिरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमधून काशीराम पावरा मारणार बाजी? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Polls : कसबा पेठमधून कोण निवडून येणार? रविंद्र धंगेकर की हेमंत रासने? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT