Fire Saam tv
महाराष्ट्र

गिरणीला आग; 48 किलोमीटर लांब गुजरातमधून अग्नीशमन बंब आला परंतु स्‍थानिक नाही

गिरणीला शॉटसर्कीटमूळे आग; 48 किलोमीटर लांब गुजरातमधून अग्नीशमन बंब आला परंतु स्‍थानिक नाही

दिनू गावित

नंदुरबार : नवापूर शहरातील लाईट बाजार या गजबजलेल्या व जुन्या भागातील सर्वात जुनी बदुडा चक्की शॉटसर्कीटने लागलेल्या आगीत बेचिराख झाली. यात लाखोंचे नुकसान झाले. या घटनेत नवापूर पालिकेचा (Navapur Palika) निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. (nandurbar Mill fire late night Fire brigade bumb came from gujarat state but not locally)

नवापुर (Navapur) शहरातील लाईट बाजार व्होरा मेडिकल समोरील अब्दुला हमीद बदुडा यांच्या मालकीचे दुकानाला रात्री १ वाजता अचानक शॉटसर्कीटने आग लागली. यात चक्की व तेल गाळण्याचे मशिनसह इतर सामान आगीत खाक झाले. या आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. आग इतकी भिषण होती की संपुर्ण दुकान आगीत (Fire) जळुन खाक झाले. आगीचा लोळ दुरपर्यत दिसत होते. नवापूर शहरात मागील काही दिवसावर विजय इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग लागली होती. या घटनेनंतर नवापुर नगरपालिकेचा निष्फळ कारभार, निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा लोकांसमोर उघडकीस आला.

गुजरातचा बंद पोहचला

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गुजरात (Gujrat) राज्यातील सोनगड, व्यारा भागातुन अग्रिशमन दलाला (Fire Brigade) पाचारण करण्यात आले होते. मात्र स्थानिक नवापूर नगरपालिकेचा अग्निशमन बंब उशिरा आल्याने शहरातील नागरीकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. गुजरात राज्यातुन ४८ किमी अंतरावर असलेल्या व्यारा नगरपालिकेतुन अग्रिशाम बंब येऊ शकतो; तर नवापूर नगरपालिकेचा अग्निशमन बंबला का उशिर झाला? असे नागरीकांमध्ये चर्चेचा विषय होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT