Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

रस्‍त्‍यावरील पाण्यातून मार्ग काढताना गेला तोल; वयोवृद्ध महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू

रस्‍त्‍यावरील पाण्यातून वाट काढताना वयोवृद्ध महिलेचा गेला तोल; पाण्यात बुडून मृत्यू

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : नवापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे (Rain) नागण मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. धरणाच्या वरती असलेल्या केळी, केवडीपाडा गावा दरम्यान जोडणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. नागरिकांना या ठिकाणी पाण्यातून जीव धोक्यात घालून वाट काढावी लागत आहे. आज केळी येथील रहिवासी रतुबाई जयराम गावित (वय ६०) या केळीहून केवडीपाडा (Nandurbar) गावात येत असताना रस्त्यावर साचलेल्या पाण्यात तोल गेल्याने धरणाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. (Nandurbar News)

गावे धरणामुळे विस्थापित झाले असून या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर धरणात जलसाठा वाढल्यावर रस्ता पाण्याखाली जातो. प्रशासनाच्यावतीने बांधण्यात आलेला पूल कमी उंचीचा व रस्ता निकृष्ट दर्जाचा तयार करण्यात आला आहे. पावसाळ्यात स्थानिक लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी पाहणी करून ठेकेदाराला भराव टाकण्यास सांगितले होते. परंतु ठेकेदाराने हलगर्जीपणा केल्याने आज वयोवृद्ध आजीचा जीव गेला आहे.

ठेकेदार, प्रशासनाचे हात वर

ठेकेदार व नागन प्रकल्प व्यवस्थापक दोघांनीही माहिती देण्यास नकार देत जबाबदारी झटकली आहे. तर गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आक्रोश व्यक्त करत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जीव गेल्याचा आरोप केला आहे. संबंधित दोषींवर कारवाईची मागणी करत पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Accidental Cockroach Party Movie: 'कॉकरोच' आंदोलनाची कहाणी आता मोठ्या पडद्यावर; अभिजीत दिपकेंची भूमिका कोण साकारणार?

Scam : राज्यपालांच्या PA च्या नावाने रेल्वेच्या VVIP तिकिटांचा घोटाळा! 'लोकभवन'च्या बनावट लेटरहेडचा वापर; ७ जणांना अटक

PF Transfer : जुनं PF खाते बंद झालं? EPFO च्या नव्या पोर्टलमुळे अडकलेले पैसे, Active UAN मध्ये ट्रान्सफर करणं झाले जास्त सोपं

Maharashtra News Live Update:भिवंडी इमारत दुर्घटना; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी पाहणी, महापालिका आयुक्तांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Lung cancer: तरूणांच्या शरीरात गपचूप घर करतो फु्फ्फुसांचा कॅन्सर; सुरुवातीची 5 लक्षणं वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT