Leopard Attack Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack: आई– मुलावर बिबट्याचा हल्ला; चार वर्षीय चिमुकल्‍याचा मृत्‍यू

आई– मुलावर बिबट्याचा हल्ला; चार वर्षीय चिमुकल्‍याचा मृत्‍यू

दिनू गावित

नंदुरबार : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तळोदा तालुक्यातील सरदारनगर पुनर्वसन गावातील आई आणि मुलगा गायी बकऱ्या चारायला जंगलात गेले होते. या दरम्‍यान (Leopard) बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ४ वर्षीय चिमुकला ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागासह (Forest Department) प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. (Nandurbar News Leopard Attack)

सरदारनगर पुनर्वसन (Nandurbar News) येथील मयत मुलाची आई बारदा विरसिंग पाडवी हिच्या बरोबर जंगलात गायी, बकऱ्या चारण्यासाठी लहान मुलगा लकी विरसिंग पाडवी हा सोबत असताना सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगलातून बिबट्याने सुरुवातीला बकऱ्यांवर हल्ला केला. आई सोडवायला गेली असता तिच्यावरही बिबट्याने हल्ला करताच जीव वाचवत तिने तिथून पळ काढला. मात्र तिचा चार वर्षीय चिमुकला लकी बिबट्याच्या तावडीत सापडल्याने हल्ल्यात जागीच ठार झाला आहे.

आमदारासह वन विभागाचे अधिकारी दाखल

आई मुलावरील बिबट्याच्या हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी (Shahada) शहादा– तळोदा विधानसभेचे आमदार राजेश पाडवी, सभापती यशवंत ठाकरे, गुड्डू वळवी आणि वन विभागाचे अधिकारी यांनी धाव घेतली. बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला असून पंचनामा करून छवविच्छेदनासाठी दाखल केले असल्याची माहिती (Taloda) तळोदा वन विभागाचे उपवनक्षेत्रपाल अधिकारी एल. एम. पाटील यांनी दिली आहे. यावेळी वनक्षेत्रपाल स्वप्नील भामरे, वनपाल वासू माळी, वनरक्षक जाण्या पाडवी, वनरक्षक चुनीलाल पाडवी आदींसह आमदार राजेश पाडवी, यशवंत ठाकरे, गुड्डू वळवी उपस्थित होते. बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला ठार झाल्याच्या परिवाराची भेट घेऊन सांत्वना दिली. तसेच शासनाच्या नियमानुसार मदत मिळवून देण्याच्या आश्वासनही आमदार राजेश पाडवी यांनी दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळी अन् छठपूजेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात 'या' ठिकाणांहून सुटणार १७०२ विशेष गाड्या

Firecracker Safety Guide: फटाके फोडताना काळजी घ्या! डॉ. अनुपम टाकळकर यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना|VIDEO

Maharashtra Live News Update: सुरतच्या उधना रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची दीड किलोमीटर लांब रांग

Viral Fever: दिवाळीनंतर वायरल तापाचा धोका वाढतो? जाणून घ्या कारण

Raigad Crime: सोशल मीडियावरच्या प्रेमासाठी तोडली सात वचनं; प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने काढला पतीचा काटा

SCROLL FOR NEXT