Farmer Suicide: शेतकऱ्याने घेतला शेतातच गळफास; कर्ज फेडीची विवंचना

शेतकऱ्याने घेतला शेतातच गळफास; कर्ज फेडीची विवंचना
Jalgaon News Farmer Suicide
Jalgaon News Farmer SuicideSaam tv

एरंडोल (जळगाव) : तालुक्यातील पिंपळकोठा येथे सोसायटीचे कर्ज, नातेवाइकांनी काढून दिलेले कर्ज व इतर हात उसनवारीचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत, तसेच सतत (Rain) पावसामुळे शेतीमध्ये होणारे नुकसान पाहून राजू सुकलाल मराठे या ५३ वर्षीय शेतकऱ्याने शेतातच गळफास घेऊन (Suicide) आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (१८ जुलै) सकाळी सुमारास घडली. (Jalgaon News Farmer Suicide)

Jalgaon News Farmer Suicide
Nandurbar: ४० वर्षानंतर पूर्ण झालेले देहली धरण पहिल्‍याच वर्षी ओवर फ्लो

पिंपळकोठा (ता. एरंडोल) येथे शेतकरी राजू सुकलाल मराठे आपल्या परिवारासह शेतीकाम करून उदरनिर्वाह करतात. शेती करण्यासाठी मुलाने सोसायटीचे कर्ज काढले आहे. जे गेल्या तीन वर्षांपासून भरले नाही. नातेवाइकांनीही सोसायटीचे कर्ज काढून दिले आहे. तसेच गावातील नागरिकांकडून मुलाच्या लग्नासाठी पैसे घेतले आहेत, ते कर्ज कसे फेडायचे. या विवंचनेत गेल्या काही दिवसांपासून राहत होते. तसेच सध्या संततधार पावसामुळे (Farmer Suicide) शेतात पिकांपेक्षा तण जास्त मोठे झाले होते.

सकाळी शेतात गेले अन्‌

सोमवारी सकाळी आठच्या सुमारास शेतकरी राजू मराठे शेतात गेले. त्यांनी शेतात असलेल्या निंबाच्या झाडास नायलॉनच्या दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी आठपासून राजू मराठे घरी आले नाही, म्हणून पत्नी सरलाबाई मराठे यांनी पुतण्या महेंद्र मराठे यास सांगितले, की काका सकाळी आठपासून शेतात गेले आहेत, अजून परत आले नाहीत. त्यामुळे महेंद्र मराठे, राजू माणिक मराठे, राजू बाळू मराठे हे तिघे दुचाकीने शेतात गेले असता, त्या ठिकाणी राजू मराठे यांनी आत्महत्या केल्याचे दिसुन आले. महेंद्र मराठे व सोबत असलेल्या दोघांनी राजू मराठे यांना खाली उतरून ट्रॅक्टरवर एरंडोल ग्रामीण रुग्णालयात आणले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याबाबत महेंद्र रामदास मराठे यांनी दिलेल्या माहितीवरून एरंडोल पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार काशिनाथ पाटील तपास करीत आहेत. मृत राजू मराठे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सून असा परिवार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com