Nandurbar RTO Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar RTO: आरटीओकडून खाजगी ट्रॅव्हल एजन्सीची तपासणी; जास्तीचे भाडे आकारल्यास कार्यवाही

Nandurbar News : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाश्यांची संख्येत वाढ झाली आहे. यामुळे रेल्वे, बससह खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करत असतात

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाश्यांची संख्येत वाढ झाली आहे. यामुळे रेल्वे, बससह (Diwali Festival) खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करत असतात. या दरम्यान गर्दीचा फायदा घेत खाजगी ट्रॅव्हल्सकडून भाडेवाढ करत लूट केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर (Nandurbar) नंदुरबार आरटीओकडून ट्रॅव्हल्स एजन्सीची तपासणी सुरु करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

दिवाळी सण असल्याने सर्वांना सुट्या जाहीर झाल्या आहेत. यामुळे नोकरीनिमित्ताने बाहेर असलेले दिवाळीसाठी घरी येत आहेत. परिणामी रेल्वे. बस व ट्रॅव्हल्सला प्रवांशांची प्रचंड गर्दी होत आहे. बस आणि खाजगी ट्रॅव्हलने अनेक नागरिक प्रवास करत असतात. मात्र खाजगी ट्रॅव्हल प्रवाशांकडून (RTO) अव्वाचे सव्वा भाडे आकारात प्रवाशांची आर्थिक लूट करत आहेत. ही गोष्ट लक्षात घेत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने नंदूरबार आणि शहादा शहरात खाजगी ट्रॅव्हल ऑफिसची तपासणी सुरु केली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महिनाभर चालेल तपासणी 

ट्रॅव्हल्स ऑफिसची तपासणी करत आरटीओने खाजगी ट्रॅव्हल चालकांना तंबी देण्यात आली आहे. सणासुदीला भाडेवाढ केल्यास ट्रॅव्हल चालकांवर कार्यवाही करण्याच्या इशारा देण्यात आहे. यासोबतच महामंडळाच्या बसेचेच्या दीडपट पेक्षा जास्त भाडे न देण्याचे आवाहन करण्यात आले असून महिनाभर ही तपासणी सुरू राहणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट

Weather Update: मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट

CNG Price Today : CNG च्या दरात मोठी वाढ, मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा झळ; आजचे ताजे दर काय? वाचा

गणेशोत्सवात गौतमीच्या कार्यक्रमाला विरोध; 'धार्मिक कार्यक्रमात गौतमीचा धांगडधिंगा कशाला?'

महाराष्ट्र हादरला! उपचाराच्या बहाण्याने २० वर्षीय तरुणीचा विनयभंग; ठाकरेंच्या शिवसैनिकांनी डॉक्टरला बदडला, आरोपी गजाआड

SCROLL FOR NEXT