Nandurbar Police Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Police : अवैध्यरित्या गॅस रिफिलिंग; पोलिसांची धाड टाकत कारवाई, सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Nandurbar News : जिल्ह्यात वेळोवेळी अवैध बाबींवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून वेळोवेळी कारवाई देखील करण्यात येत आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधपणे वापर करत गॅस रिफिलिंग करण्यात येत असते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे प्रकार सुरु असून त्यांच्या कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानुसार पोलिसांनी नंदुरबार शहरात तीन ठिकाणी व नवापूर येथे एका ठिकाणी धाड टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ३ लाख २० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

जिल्ह्यात वेळोवेळी अवैध बाबींवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून वेळोवेळी कारवाई देखील करण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदामार्फत मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरातील गाझी नगर परिसर, भोणे फाटा परिसर, पटेलवाडी परिसर तसेच नवापूर येथील सरकार चौक परिसरात अवैधपणे गॅस रिफिलिंग करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. 

३ लाख २० हजाराचा मुद्देमाल हस्तगत 

या भागांमध्ये विना परवाना घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधील गॅस हा मोटारीचे सहाय्याने वाहनांमध्ये भरुन रिफिलींगचा व्यवसाय करीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन ठिकाणी विनापरवाना गॅस रिफिलींग करित असल्याचे दिसून आले. या कारवाई दरम्यान पोलिसांनी याठिकाणी असलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामध्ये ३७ सिलेंडर, ७ इलेक्ट्रीक मोटर, ४ वजन काटे असा एकुण ३ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. 

सहा जणांवर गुन्हा दाखल 

दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईत सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये गाझी नगर परिसरात अफसरोहीन नवाजोद्दीन काझी (वय २७), भोणे फाटा परिसरात दिनेश लोटन चौधरी (वय ५०) व पटेलवाडी परिसरात आसिफ दादाभाई पिंजारी (वय ३९), पटेलवाडी परिसरात फयाज सईद कुरेशी (वय १९), दुकान मालक आमीन वाहीद पिंजारी, तसेच नवापूर येथील सरदार चौक परिसरात जुनेद फारुक काथावाला याचेविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT